leopard esakal
नाशिक

Nashik Leopard News : सिन्नर शहरातील गोळेसर फार्म हाऊस परिसरात बिबट्याचा थरार; शेळी फस्त

Nashik Leopard : सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी रोड परिसरातील असलेल्या गोळेसर फार्म हाऊसवर बिबट्याने रविवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी रोड परिसरातील असलेल्या गोळेसर फार्म हाऊसवर बिबट्याने रविवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. दुसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास पोपट विष्णू लोंढे यांच्या घरी बिबट्याने हल्ला करीत शेळीला ठार केले. तर दुसऱ्या घटनेत अमोल गोळेसर यांच्या फार्म हाऊस वर त्यांचे सालगडी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने . ( Leopard attack in golesar Farmhouse area of ​​Sinnar )

शेळीने प्रतिकार केल्याने शेळी यातून बचावले असून, शेळी घाबरली असल्याचे अमोल गोळे सर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या जुन्या केल्या कंपनीच्या मागे गोळेसर यांचे फार्म हाऊस असून. जवळच नदी तसेच उसाचे ,मका क्षेत्र असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याच दरम्यान या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

भामलवाडी (ता. रावेर) परिसरात सात ते आठ दिवसांपासून बिबट्या गावात आणि गावाबाहेर रात्रीच्या वेळेस फिरत असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. यापुर्वी बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला होता. मागील महिन्यात कोठुळकर यांच्या घरावर बिबट्याने पशुधनावर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते.

सायंकाळच्या दरम्यान बिबट्या मुक्तेश्वर नगर समोरील परिसरात तसेच गोळेसर फार्म हाऊस वर येत परिसरातील नागरिक मध्ये भितीचे वातावरण आहे. वन विभागाने लवकरात लवकर या भागात पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथे रविवारी बिबट्याने एका नागरिकांवर हल्ला केल्याचे समजत असून त्यामुळे बिबट्याचा वावर सिन्नर तालुक्यात वाढलेला दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT