Leopard
Leopard esakal
नाशिक

Nashik Leopard News : त्रिंगलवाडी, कावनई परिसरातील बिबट्या जेरबंद होईना! माणिकखांब परिसर दहशतीखाली

विजय पगारे

इगतपुरी : त्रिंगलवाडी, कावनई शिवारात महिन्यापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न होत असताना, आता घोटीजवळील माणिकखांब परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. परिसरात रब्बी व भाजीपाला लागवड सुरू आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यापासून धास्तावला आहे. (Nashik Leopards in Tringalwadi Kavnai area will not caught yet Manikkhamb area under terror marathi news)

मुंबई महामार्गालगत असलेल्या माणिकखांब शिवारात काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. परिसरातील पाळीव प्राण्याचाही फडशा बिबट्याने पडल्याचे सांगण्यात आले. शेतात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी माजी सरपंच हरीश चव्हाण यांनी केली आहे.

सध्या शेतीच्या रब्बीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, दिवसा व रात्री शेतकऱ्यांना शेतात, रानात जावे लागते, तसेच बहुतांश शेतकरी रानातच पिकांच्या रक्षणासाठी शेतातच खोपी करून राहत असल्याने सर्वांनीच बिबट्याची धास्ती घेतली आहे. परिसरातील नागरिकही बिबट्याचा दहशतीखाली आहेत. (Latest Marathi News)

वन विभागाचे अपयश

गेल्या महिन्यात त्रिंगलवाडी शिवारात पहाटे बिबट्याने एका युवतीचा बळी घेतला होता, तर कावनई परिसरातही बिबट्याने नागरिकांना त्रस्त करून सोडले होते. हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तीन- चार पिंजरे, ट्रॅप कॅमेरे लावले होते.

मात्र, महिना उलटूनही अद्याप बिबट्या जेरबंद झाला नाही. यात वन विभागाचे अपयश की बिबट्याचा चलाखपणा याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चा होत आहे. त्यात आता जवळच माणिकखांब शिवारातील बिबट्याने वन विभागाची डोकेदुखी वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT