Lohkare family extracting sugarcane juice using the traditional method.
Lohkare family extracting sugarcane juice using the traditional method. esakal
नाशिक

Nashik News : रसवंती व्यवसायातून फिरली संसाराची चाके! लोहकरे कुटुंबियांनी शोधला रोजगाराचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यावर्षी पाऊस न झाल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पावसाअभावी शेतीवर अवलंबून न राहता संसाराचा गाडा ओढण्यासाठी इतर जोडधंद्यांचा मार्ग निवडावा लागत आहे. मनमाड-नांदगाव रोडलगतच्या लोहकरे कुटुंबियांनी पारंपारिक पद्धतीचे रसवंतीगृह सुरू करून रोजगाराचा नवा पर्याय शोधला आहे. उसाचा थंड रस नागरिकांना उन्हापासून थंडावा देत आहे. (nashik Lohakare family found employment option through Raswanti business marathi news)

गुऱ्हाळघराचे वैशिष्ट्ये म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधूले जाते. दूरवरून येणारा आवाज ऐकूनच प्रत्येकजण ‘आता रस घेवूया’ असे म्हणत रसवंतीगृहाकडे वळत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात उष्णतेने उच्चांक गाठल्याने नागरीक हैराण झाले आहेत. सध्या उष्णतेचा पारा ३८ अंशावर आल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. (Latest Marathi News)

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना मोठी मागणी असते. ऊसाचा रस व नारळपाण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान राखले जाते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून प्रफुल्लीत बनवते. त्यामुळे उसाच्या ताज्या रसाला ग्राहक अधिक पसंती देतात.

''शेतीला जोडधंदा तसेच उन्हाळामध्ये शेतीकामे नसल्याने अनेक वर्षापासून रसवंतीचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायमुळे संसाराचा हातभार लागतो.''- कल्पना लोहकरे, रसवंतीगृह व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT