Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नाव दिंडोरी पण चायना, निफाडचा राहणार बोलबाला; मतदारसंघात वाढले 3 लाख 11 हजार मतदार

संतोष विंचू

Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासून आरक्षित राहिला आहे. यामुळे अनेक मातब्बरांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंग पावले आहे. त्यामुळे याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील नेतेगण आपल्या बालेकिल्ल्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच ताकद लावतात. त्यामुळे मतदारसंघ दिंडोरी असला तरी चायना (चांदवड, येवला, नांदगाव) निफाडचा राजकीयदृष्ट्या बोलबाला राहणार आहे. (nashik lok sabha election voters increased in constituency marathi news)

नाशिक व मालेगाव मतदारसंघाचे विभाजन होऊन २००८ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. यात नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदारसंघांनी भाजपला मताधिक्य दिल्याचा इतिहास आहे. २०१४ च्या निवडणुकीत तर एकट्या नांदगावने ७४ हजार, चांदवड-देवळ्याने ८० हजार तर निफाड-येवल्याने ६५ हजारांचे मताधिक्य दिले.

त्यामुळे यावेळीदेखील या विधानसभा मतदारसंघाचा पुन्हा वरचष्मा दिसणार आहे. २००९ मध्ये याठिकाणी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली.तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्ममध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे. दिंडोरी हा आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेला मतदारसंघ असल्याने येथे रस्सीखेच नसल्याचा फायदा उमेदवारांना तिन्ही वेळेस झाला आहे.

या मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड व दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र या सहाही ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीचे प्राबल्य असूनही नशीब बलवत्तर म्हणून की काय प्रत्येकवेळी एकाच पक्षाला साथ मिळाली आहे. (latest marathi news)

● शेतीप्रश्न येणार चर्चेत

या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर असून मांजरपाडासारखा तहान भागविणारा प्रकल्प तसेच चांदवड व येवलेकरांसाठी वरदान ठरणारा पुणेगाव डोंगरगाव पोहोच कालव्याचा प्रश्न आहे.पूर्णत: शेतीशी निगडित हा मतदारसंघ असून कांदा उत्पादनातही सर्व तालुके अग्रेसर आहेत. त्यामुळे शेतीमालाच्या भावासह कांदा निर्यातबंदीचा प्रश्न यावेळी चांगला चर्चेत येणार आहे.

● मागील वेळी तिरंगी लढत!

२०१९ च्या निवडणूकीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी बाजी मारली होती.त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले होते तर ६४ टक्के मतदानाची नोंद झाली.२०१४ मध्ये या मतदारसंघात ६३.४० टक्के मतदान झाले होते.

या तुलनेत २०१९ मध्ये ०.६०इतकी मतदानाची वाढ झाल्याचे दिसून आले.एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.भाजप-सेना महायुतीकडून डॉ.भारती पवार, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून धनराज महाले तर माकपाकडून जे.पी.गावित या प्रमुख उमेदवारात तिरंगी लढत बघायला मिळाली होती.

३ लाख ११ हजार मतदार!

२०१९ मध्ये ६ मतदारसंघ मिळून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ८ लाख ८ हजार पुरुष आणि ७ लाख २२ हजार महिलांसह एकूण १५ लाख ३० हजार १३९ मतदार होते. आता तब्बल ९ लाख ५४ हजार ७२० पुरुष व ८ लाख ८६ हजार ९९४ महिला मिळून १८ लाख ४१ हजार ७५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ लाख ११ हजार मतदार वाढले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT