5 liquor shops in district closed for week esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यातील 5 दारूची दुकाने आठवडाभरासाठी बंद

Nashik News : देशी, विदेशी मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांमधून ठोक मद्यविक्री होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्यांचे निरीक्षण करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे अवैध मद्यविक्री व तसेच मद्य वितरणाचा निवडणूकप्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होणार नाही, याची खबरदारी म्हणून तपासणीअंती सटाणा, ओझर, ठाणगाव (सिन्नर), पालखेड मिरची (निफाड) व सावरगाव-गंगापूर ही पाच दारूची दुकाने आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आली आहेत. (5 liquor shops in district closed for week)

नाशिक जिल्ह्यामध्ये मतदानासाठी सात दिवस शिल्लक असताना किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांमधून ठोक मद्यविक्री होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्यांचे निरीक्षण करण्यात येत आहे.

ज्या अनुज्ञप्तीधारकांनी त्यांचे अनुज्ञप्तीमधून ठोक मद्यविक्री केल्याचे व अनुज्ञप्तीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त मद्यसाठा साठवणूक केल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा खालील किरकोळ देशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील सात दिवसांकरिता निलंबित करण्यात आलेले आहे. (latest marathi news)

सात दिवसांकरिता निलंबित करण्यात आलेले वाइन शॉप

चंद्रकांत दामोदर रौंदळ (सटाणा)

संतोष जवरचंद भमोरे (ओझर)

मालतीबाई अशोक पानसरे (ठाणगाव, ता. सिन्नर)

प्रताप मथुरादास चांदे ( पालखेड मिरची, ता. निफाड)

गीताबाई नारायण देशमुख (सावरगाव- गंगापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT