Shantigiri Maharaj esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : गुन्हा लपविल्याची शांतिगिरींविरुद्ध तक्रार

Lok Sabha Election : अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी त्यांच्यावर औरंगाबाद न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची माहिती लपविल्याची तक्रार शेख इक्बाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Lok Sabha Election Complaint against Shantigiri maharaj for concealing crime)

उमेदवाराला नामनिर्देशन पत्राबरोबर आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करावी लागते. तसेच, त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती किंवा जाहिरात वृत्तपत्रांमधूनही देणे बंधनकारक असते. अपक्ष उमेदवारी अर्जात आपल्यावर एकही गुन्हा किंवा खटला दाखल नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आपण कोणताही गुन्हा लपविला नसून, त्याबाबत आपल्याला कोणतीच सूचना प्राप्त झालेली नसल्याचे महाराजांच्या समर्थकांनी म्हटले आहे. (latest marathi news)

शांतिगिरी महाराजांच्या विरोधात ‘प्राचीन स्मारक संरक्षण’ या कायद्यानुसार औरंगाबाद सत्र न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा दाखला दिला आहे.

आता या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी न्यायालयातच करावी लागेल. निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका केवळ छाननीपर्यंत असते. त्यानंतरची प्रक्रिया न्यायालयात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT