Shiv Sena office bearers cheering at the party office after the announcement of Rajabhau Vaje's candidature from the Uddhav Balasaheb Thackeray group on Wednesday. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : राजाभाऊ वाजेंचे शक्तिप्रदर्शन; शिवसेना भवनात सत्कार

Lok Sabha Election : आमदार राजाभाऊ वाजे यांची बुधवारी (ता. २७) उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या शालिमार कार्यालयाबाहेर आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची बुधवारी (ता. २७) उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या शालिमार कार्यालयाबाहेर आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळण्याचा धर्म असल्याचे सांगत वाजे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. (Nashik Lok Sabha Election Rajabhau Waje felicitated at Shiv Sena Bhavan marathi news)

बुधवारी वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानिमित्त शिवसेना भवनात त्यांचा सत्कार झाला. या वेळी वाजे यांचे आगमन होताच ‘आगे बढो’च्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, की वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे. वाजे यांच्या रूपाने निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली आहे.

नाशिक मतदारसंघ महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले, की भाजप व गद्दारांना गाडण्याची हीच संधी आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत असल्याने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. वाजे यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आल्याने हीच विजयाची सुरवात आहे.

जातीपातीच्या राजकारणाला थारा देऊ नका. पक्ष, खासदार, आमदार, घरे फोडणाऱ्या व समाजात भांडणे लावणाऱ्या भाजपला गाडण्याची हीच वेळ असल्याचे माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले. माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, मुशीर सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, सचिन मराठे, दीपक दातीर आदी उपस्थित होते. (latest marathi news)

निष्ठेचे फळ मिळाले ः वाजे

‘मी जिवंत आहे, तोपर्यंत शिवसेनेतच राहील’, असा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. त्याप्रमाणे वागलो. त्यानंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. गेल्या निवडणुकीत कमी पडलो. परंतु पक्षाची साथ सोडली नाही. मध्यंतरी अनेकांनी आमिषं दाखविली. राजकारणात शब्द पाळायचा नसतो, असे सांगत खिल्ली उडविली. शब्द पाळल्याने उमेदवारी मिळाल्याचे वाजे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

अप्पांची समजूत काढणार

विजयअप्पा करंजकर यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने ते बंडखोरीच्या पावित्र्यात आहे. यावर बोलताना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर निष्ठावान शिवसैनिक असून बंडखोरी करणार नसल्याचा दावा करत त्यांची समजूत काढली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षनेतृत्वाच्या निर्णया विरोधात ते उभे राहणार नाही. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनीही दोन दिवसात करंजकर यांची मनधरणी करणार असल्याचे सांगितले.

वाजे- करंजकर भेट

करंजकर यांच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी जाहीर झालेले राजाभाऊ वाजे विजय करंजकर यांची भेट घेणार आहेत. करंजकर संभाव्य उमेदवार असताना त्यांच्या प्रचारासाठी आम्ही काम केले. आता पक्षाने उमेदवारीसाठी आपले नाव जाहीर केल्यानंतर करंजकर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू असे राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT