Police Alert on Social Media esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

Lok Sabha Election 2024 : गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराचेही महत्त्व वाढले आहे.

- नरेश हाळणोर

Nashik Lok Sabha Police Alert : कधीनव्हे ते लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांची पातळी ओलांडली जात आहे. तसेच, सोशल मीडियाचाही वापर मोठ्याप्रमाणात केला जातो आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर, आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हायरल केले जाण्याची शक्यता असल्याने, अशा बाबींवर करडी नजर ठेवण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र टीम दिवसरात्र कार्यरत आहे. (Nashik loksabha election 2024 Alert Cyber ​​Police news)

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांनी अक्षरश: राळ उठविली आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, अजून दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आपआपल्या पक्षाचा आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत. प्रचार सभांमधून नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.

मात्र, गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराचेही महत्त्व वाढले आहे. कोणत्याही घटनेचा प्रतिबिंब सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटते आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांकडूनही सोशल मीडियाचा प्रचारासाठी खुबीने वापर केला जातो आहे.

परंतु, सोशल मीडियातून जसा प्रचार होतो आहे, तसाच या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हायरल करीत बदनामी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व बदनामीकारक संदेश व्हायरल होऊन सामाजित तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

असे होऊ नये यासाठी सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकामार्फत दिवसरात्र सोशल मीडियावरील संदेश, मजकुरांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत कोणताही अनुचित प्रकार सोशल मीडियावर झालेला नाही. तरीही सायबरचे पथक डोळ्यात तेल घालून सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. (Latest Marathi News)

असे होऊ शकते

- प्रचारात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बदनामीचा प्रयत्न

- सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेशाचे व्हायरल

- आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे

- महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणे

- मॉर्फफोटो वा व्हिडिओ व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न

- एखाद्या नेत्याला धमकी देणे

असे आहे पथक

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस अधिकारी व तीन अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकाकडून सोशल मीडियावर ठराविक ‘की-वर्ड’ वापरून सायबर सर्फिंग केली जाते.

"निवडणुक काळात सोशल मीडियाचाही वापर वाढल्याने त्यावरून आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर व्हायरल होण्याची दाट शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर पोलिसात स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आलेली आहे."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT