Newly elected MP Bhaskar Bhagre while inspecting the farm damaged by 'Sukhoi' on Wednesday. esakal
नाशिक

Nashik Sukhoi Crash : ‘सुखोई’मुळे 61 लाखांचे नुकसान! शासनातर्फे पंचनामा

Nashik News : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सुखोई-३० हे लढाऊ विमान कोसळल्याने तीन शेतकऱ्यांचे ६१ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सुखोई-३० हे लढाऊ विमान कोसळल्याने तीन शेतकऱ्यांचे ६१ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे. यात द्राक्षबाग, तार कंपाउंड, एक लाखाची कोबी, अडीच लाखांच्या कूपनलिका व विहिरीचे नुकसान झाल्याची नोंद गावचे तलाठी केदार यांनी पंचनाम्यात केली. (Nashik Loss of 61 lakhs due to Sukhoi Aircraft crash)

दरम्यान, नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी याठिकाणी भेट देत शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. सुखोई-३० हे लढाऊ विमान मंगळवारी (ता. ४) दुपारी एकला शिरसगाव येथील शेतकरी सुकदेव पोपट मोरे, ज्ञानेश्‍वर नारायण मोरे व लक्ष्मण नारायण मोरे यांच्या शेती गट क्रमांक २६, १३३ व १३२ मध्ये कोसळले. वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडल्याने जीवितहानी झालेली नाही.

परंतु विमानामुळे द्राक्षबागेचे, कोबी पिकाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तत्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. गावचे तलाठी केदार यांनी बुधवारी (ता. ५) घटनेचा पंचनामा केला. यात ०.८५ आर क्षेत्रात असलेल्या द्राक्षबागेचे नुकसान झाले.

बागेचे अँगल आणि तारा तुटल्याने त्यांचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ड्रिपच्या नळ्या जळून गेल्याने अंदाजे नुकसान दीड लाख रुपये दिसून येते. पुढील सहा वर्षांच्या द्राक्ष उत्पन्नाचा विचार केला तर ५० लाखांचे उत्पन्न बुडणार आहे. त्यामुळे एकूण नुकसानीचा आकडा ६१ लाख ३० हजारांवर पोहोचल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली. त्यावर सरपंच रवींद्र शिरसाठ, पोलिसपाटील लीला कराटे, मुकुंद मोरे, उमेश मोरे व शंकर मोरे यांच्या सह्या आहेत. (latest marathi news)

मागील घटनेच्या मदतीची प्रतीक्षा

निफाड तालुक्यात काही वर्षांपूर्वी विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आता शिरसगावच्या शेतकऱ्यांना तरी मदत मिळणार का, याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

असे झाले नुकसान

गट क्र. १३३, १३२

लोखंडी अँगल व तारा- चार लाख (एकरी) रु.

ड्रीपचे साहित्य- दीड लाख रु.

द्राक्षबाग- ५० लाख रु.

गट क्र. २६

कोबी- एक लाख रु.

कूपनलिका- दीड लाख रु.

विहीर व इतर इलेक्ट्रिक वस्तू- अडीच लाख रु.

मल्चिंग पेपर, ड्रीपचे साहित्य- ३० हजार रु.

लोखंडी अँगल आणि तारा- ५० हजार रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT