Indiranagar: While giving a statement to Senior Inspector Sanjay Bamble, Ram Singh Rajput, Prasad Auto, Datt Dangwal, Sagar Deshmukh etc. esakal
नाशिक

Nashik Love Jihad Update : अखंड हिंदू समाजातर्फे पोलिसांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : लव्ह जिहादसारखे प्रकार देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत. असले प्रकार घडू नयेत म्हणून स्थानिक पातळीवर पोलिस प्रशासन आणि सरकारने आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी इंदिरानगर परिसरातील स्थानिक अखंड हिंदू समाजातर्फे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनानुसार श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून आफताब पुनावाला या तरुणाने तिची दिल्ली येथे थंड डोक्याने निर्घृण हत्या केली. आता हा केवळ एक अपवादात्मक प्रकार राहिला नसून देशभरात असे हजारो प्रकार नियमितपणे उघडकीस येत आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यासाठी अनेक वेळा स्वतःची ओळख लपवून लव्ह जिहाद सारखे षडयंत्र रचले जात आहे. (Nashik Love Jihad Update Statement to Police by Akhand Hindu Samaj Nashik News)

असले प्रकार देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत. या प्रकारावर स्थानिक पातळीपासून आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

या वेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामसिंग राजपूत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद औटे, सन्मित्र अहीर सुवर्णकार समाज इंदिरानगर परिसराचे अध्यक्ष दत्ता दंडगव्हाळ, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा चिटणीस तुषार जगताप, विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर संपर्कप्रमुख पंडितजी देशमुख, हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख, भोईसमाज मित्रमंडळाचे भारत डांगरे, गोकुळ अनर्थे, प्रमोद लासुरे, दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रवींद्र वाटेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी धिरज जोशी, हर्षल फुलदेवरे, राजू शिंदे, नाना दंडगव्हाळ, स्वप्नील वाघ, पुष्कर देशपांडे, तुषार कासार, अप्पासाहेब शेजवळ, संदीप पाटील, विश्वनाथ मानमोठे, साजन थोरात, मनीष लोखंडे, गजानन लिपने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT