check post  esakal
नाशिक

Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

Nashik News : केंद्र शासनाच्या वतीने राज्यांच्या सीमेवरील नाके (चेक पोस्ट) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक राज्यांच्या सीमेवर चेक पोस्ट सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : केंद्र शासनाच्या वतीने राज्यांच्या सीमेवरील नाके (चेक पोस्ट) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक राज्यांच्या सीमेवर चेक पोस्ट सुरू आहे. हे नाके बंद करण्यात यावे, यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस च्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. (Border check post closed by Madhya Pradesh government)

या पाठपुराव्याला मोठे यश मिळालं असून मध्यप्रदेश सरकारने १ जुलैपासून आपले बॉर्डरवरील नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली.

केंद्र सरकारच्या वतीने ई वे बिल सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या बॉर्डरवरील नाके बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आला. मात्र तरी देखील अनेक राज्यांच्या बॉर्डर वरील नाके सुरू होते. (latest marathi news)

या चेक पोस्टच्या माध्यमातून चालकांची मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने लूट करण्यात येत होती. यावर नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

मध्यप्रदेश सरकारने १ जुलैपासून नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्टचे मध्यप्रदेश सरकार आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान, चेअरमन डॉ. जि. आर. शांमूगप्पा, मलकित सिंग बल यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

SCROLL FOR NEXT