Traffic congestion caused by Mosam bridge work esakal
नाशिक

Nashik News : मालेगावी रस्ते- पुलांच्या कामांनी वाहतुकीचा खोळंबा! बहुतेक ठिकाणी एकेरी मार्गाचाच वापर

Nashik News : महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या दरम्यान मोसम पुलाच्या कामामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. शिवाय मोसम नदीवरील येथील मोसमपुलाचे नवीन काम तसेच उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. विकासकामे होत असली तरी कामांमुळे अनेक ठिकाणी एकेरी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे. अशा ठिकाणी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा सुरु असतो.

विशेषतः: महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या दरम्यान मोसम पुलाच्या कामामुळे सातत्याने वाहतूक कोंडी (Traffic) होत आहे. वाहतूक शाखेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलिस दिवसभर नियुक्त करावेत. रावळगाव नाक्यावरील रस्त्याच्या कामामुळे सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी देखील वाहतूक पोलिसाची गरज आहे. (Nashik Malegaon obstruct traffic marathi news)

शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. यातील अनेक कामे मार्गी लागली. कॉंक्रीटीकरणाच्या कामास मोठा कालावधी लागतो. या काळात एकाच बाजूने वाहनांना ये-जा करावी लागते. रावळगाव नाका ते चर्च दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

आतापर्यंत एकाच बाजूच्या रस्त्याचे काम झाले. परिणामी वाहतूक एकाच रस्त्यावरून होत आहे. सायंकाळी चारनंतर येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची गरज आहे. वाहन कोंडीमुळे अनेक वेळा वाहनचालकांमध्ये हमरीतुमरी होत असते. (Latest Marathi News)

मोसम नदीवरील जुन्या मोसमपुलाचे कामदेखील सुरु आहे. येण्या-जाण्यासाठी दोन पूल एकमेकाला लागून आहेत. एका पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे दुसऱ्या पुलावरून वाहने ये-जा करतात. महात्मा फुले पुतळा ते शिवाजी पुतळा दरम्यान दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. फुले पुतळ्याजवळ वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाजी पुतळा परिसरात देखील वाहतूक पोलिस कार्यरत केल्यास वाहतूक सुरळीत होईल.

उड्डाणपुलाचे काम संपणार कधी?

नवीन बसस्थानकाजवळ बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. या कामामुळे पूर्व भागात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होतो. या कामामुळे धुळ्यासह खानदेशाकडे जाणाऱ्या बस जुन्या बसस्थानकावरून मनमाड चौफुलीमार्गे जात आहेत. उड्डाणपुलाजवळ देखील कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT