Mahatma Phule vegetable market.
Mahatma Phule vegetable market. esakal
नाशिक

Nashik Vegetables Rate Hike : मालेगावला उन्हामुळे भाजीपाला कडाडला!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vegetables Rate Hike : तालुक्यासह कसमादे परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. सर्वत्र टंचाई जाणवत असून, शेतकरी प्रतिकुल परिस्थितीत भाजीपाला जगवित आहेत. आठवड्यापासून येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाव वाढले आहेत. वांगी ६०, तर गवारचा भाव किलोला ८० रुपयांवर गेला आहे. भविष्यात लग्नसोहळ्यांमुळे भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Nashik Malegaon Vegetable prices increased due to decrease in arrival due to summer)

कसमादे परिसरात उन्हाचा पारा वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठाला आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये लागवड केलेला भाजीपाला सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी कांद्याचे जम्बो उत्पन्न घेतले आहे. कांद्याबरोबरच काही शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व भाजीपाला लागवड केली आहे.

उन्हाची तीव्रता वाढतांनाच भाजीपाल्याची आवक घटू लागली आहे. येथील भाजीपाला बाजारात टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक, भेंडी, गवार, दोडके, गिलके, कारले, वांगी, ढेमसे, चवळी, शेवगा यासह विविध भाजीपाल्याची आवक गेल्या आठवडाभरापासून घटली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने अनेकांनी जानेवारी महिन्यात कमी दिवसात येणाऱ्या पिकाची लागवड केली होती.

एप्रिल महिन्यापासून भाजीपाला तेजीत असणार आहे. दोन महिन्यांपूर्वी अवघ्या एक रुपयाला मिळणारी कोथिंबीरची जुडी सध्या किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयाला मिळत आहे. गवार, कारली, वांगी आदींचे भाव किलोला ५० ते ८० रुपयांदरम्यान आहे. येथील बाजारात भाजीपाला प्रामुख्याने मालेगाव तालुका तसेच कसमादे परिसरातील काही भागातून येतो. चाळीसगाव तालुक्यातून गवार व भेंडी विक्रीस येत आहे. (latest marathi news)

तसेच, हिरवी चवळी धुळे जिल्ह्यातून येत असल्याचे घाऊक व्यापारी महेंद्र वाघ यांनी सांगितले. रमजानमुळे शहरात अनेक ठिकाणी पालकची भजी तयार करुन दिली जाते. येथील विशेष बाजारात प्रत्येक हातगाडीवर पालकची भजी मिळते. असंख्य नागरीक या महिन्यात पालक खरेदी करतात. मागणी वाढल्याने पाच रुपयाला मिळणारी पालकची जुडी सध्या १५ ते २० रुपयांना मिळत आहे.

भाजीपाला महागल्याने हातगाड्या घटल्या

शहरात रमजान पर्वात भाजीपाल्याला मागणी कमी असते. रमजानमध्ये फळांची मागणी वाढते. भाजीपाला महागल्याने येथे ३० टक्के हातगाड्या कमी झाल्या आहेत. भाजीपाला विक्रेते केळी, टरबूज, पपई, खजूर, शेवई, चप्पल यासह विविध प्रकारचा माल विक्री करीत आहेत. महिनाभरासाठी अनेक जण पर्यायी व्यवसायाकडे वळले आहेत. रमजाननंतर आंब्यांचा हंगाम हातगाडीवरील विक्रेत्यांसाठी लाभदायी ठरेल.

"सध्या भाजीपाला बाजारात आवक कमी आहे. रमजान व भाव वाढीमुळे मालाला उठाव कमी आहे. रमजान महिना संपल्यानंतर भाजीपाला तेजी असणार आहे. सध्याच्या किंमती एप्रिलच्या मध्यानंतर दुप्पटीने वाढ होण्याचा अंदाज आहे." - नाना कदम, घाऊक व्यापारी, भाजीपाला मार्केट

भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो)

टोमॅटो : २० रुपये

भेंडी : ५० रुपये

गवार : ८० रुपये

दोडके : ६० रुपये

गिलके : ६० रुपये

कारले : ६० रुपये

गावराणी वांगी : ६० रुपये

काळी वांगी : ४० रुपये

ढेमसे : ४० रुपये

चवळी : ५० रुपये

शेवगा : ५० रुपये

जुडीचे दर

मेथी : २०

पालक : १५

कोथंबिर : १५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT