A potter community member while training to make artistic pots from clay.
A potter community member while training to make artistic pots from clay. esakal
नाशिक

Nashik News : राज्यातील पहिले पॉटरी क्लस्टर ममदापूरला! कुंभार कारागिरांना प्रशिक्षण सुरू

संतोष विंचू

Nashik News : मातीपासून भांडी बनविण्याची कला तशी जुनीच; परंतु बदलत्या काळासोबत या कलेतून साकारलेल्या वस्तू शोभेसह फॅशनच्या बनल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. याच कलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातले पहिले पॉटरी क्लस्टर तालुक्यातील ममदापूर येथे साकारले आहे. या माध्यमातून कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ झाला. (nashik Mamdapur first pottery cluster in state marathi news)

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेच्या पुढाकाराने राजापूर-ममदापूर रस्त्यावर स्वतंत्रपणे जागा घेऊन या ठिकाणी नाशिक पॉटरी क्लस्टर उभे राहिले आहे. कुंभार व्यवसायाला आधुनिक टच देऊन चालना देण्याचा हेतू आहे. यासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाने खादी ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने अर्थसहाय्यातून उपलब्ध झाला आहे.

सुमारे ३७ लाख रुपये कुंभार समाज संस्थेने गुंतवले आहे. कुंभार कारागिरांना मातीपासून विविध मातीच्या वस्तू तयार करण्यात येणार आहेत. येवला परिसरातील कुंभार कारागिरांना यातूनच रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

कुंभार व्यवसायाला मिळणार गती

माती क्लस्टर केद्रामध्ये प्रशिक्षण घेऊन कारागीर आपल्या हस्तकलेतून विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू बनविणार आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या कुंभार समाजाला सणासह शोभेच्या वस्तू व इतर भांडी बनवून बाजारात विक्रीसाठी ठेवता येणार आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेले ममदापूर येथील कुंभार कारागीर वाल्मीक शिरसाठ यांनी आतापर्यंत मातीच्या विविध वस्तू बनविलेल्या मातीची भांडी, वस्तू या एक आकर्षण बनत आहे.

८० टक्के अनुदानावर मिळणार यंत्र

कारागिरांना इलेक्ट्रॉनिक यंत्र २० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ८० टक्के सबसिडी दिली जाणार आहे. यंत्राच्या सहाय्याने चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन कलाकार देखण्या वस्तू साकारणार आहेत.

ममदापूर रस्त्यावरील माती क्लस्टर केंद्र आता राज्यातील कारागिरांसाठी आकर्षण केंद्रबिंदू ठरणार आहे. मातीपासून तांब्या, ताट, पातेल, मातीचे कुकूर, खापर, रांजण, माठ, महिलांना मकरसंक्रांतीच्या सणासाठी बोळके, वाण असे विविध प्रकारचे भांडी बनविली जाणार आहेत.

६० जणांना प्रशिक्षण सुरू

या क्लस्टरमध्ये पहिल्या टप्प्यात ६० कुंभार कारागिरांना प्रशिक्षण दिले जात आहे. कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी संदीप मोरे, वाल्मीक शिरसाठ, सुनील शिरसाठ, दादासाहेब शिरसाठ, बाळकृष्ण कुंभार हे विशेष परिश्रम घेत आहेत. यंत्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यावर नक्षीकाम करून देखणे रूप देण्याची कला या ६० कुंभार बांधवांना या प्रशिक्षणात शिकवली जात आहे.

महाराष्ट्र कुंभार विकास समाज अध्यक्ष मनोहर जगदाळे, जिल्हाध्यक्ष कृष्णा सोनवणे, दत्ता डाळसकर, तालुका अध्यक्ष नंदकुमार सोनवणे, भागवत, सूर्यवंशी, सरपंच विजय गुडघे, गोरख वैद्य, मच्छिंद्र साबळे, बाळासाहेब वैद्य आदींच्या हस्ते यंत्र पूजन करून या प्रशिक्षणाला सुरवात झाली.

''तीन वर्षांपूर्वी कुंभार व्यवसायाला नवी ओळख देण्याच्या हेतूने आम्ही हे क्लस्टर स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, त्याचा हेतू सफल होत आहे. अनेकांना हा प्रकल्प आवडत असून, रोजगार उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. कारागिरांची वाढती मागणी पाहून यंत्र मागणी केली आहे. अनेक जण या माती क्लस्टर केंद्राला भेट देत असून पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.''-कृष्णा सोनवणे, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज संस्था (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT