Market Committee nashik esakal
नाशिक

Nashik Market Committee Election : उमेदवारी अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष; निवडणूक ठरणार काटे की टक्कर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee Election : स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी पिंपळगाव बाजार समितीच्या रणधुमाळीने निफाड मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले आहे. (Nashik Market Committee Election everyone attention is drawn towards withdrawal nashik news)

कुठे तरी आपले अस्तित्व असावे यासाठी या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातून तब्बल ३०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पंधरा अर्ज बाद झाल्यानंतर आता २९४ अर्ज शिल्लक असून माघारीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या गटात १८ जागांसाठी काटे की टक्कर होईल.

निवडणुकीचा ज्वर मात्र चढला असून वेगवेगळ्या चर्चांना तसेच काय भाव फुटणार याबाबत उधाण आले आहे. दरम्यान आमदार बनकर यांनी निर्माण केलेल्या सहा सोसायट्याच्या संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतची सुनावणी आता उच्च न्यायालयाने ६ जूनला ठेवली आहे. त्यामुळे त्या ७८ मतांचा विषय या निवडणुकीपुरता तरी संपल्यात जमा आहे.

पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी त्रिशतक गाठत धो धो पावसासारखे अर्ज दाखल झाले. एका जागेसाठी सोळा अर्ज अशी सध्याची स्थिती आहे. उमेदवार अर्ज माघार प्रक्रिया सुरू होऊन पाच दिवस उलटले पण अद्याप एकही इच्छुक माघारीसाठी पुढे आलेला नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

आता माघारी गुरूवार (ता.२०) होणार असून तेव्हाच काय ते चित्र स्पष्ट होईल. तत्पुर्वी आमदार बनकर व कदम यांच्याकडे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांकडून फिल्डींग लावली जात आहे. दोघांना इच्छुकांची बंडखोरी थोपविण्याचे आव्हान आहे. माघारीचा अंतिम दिवस जवळ येऊ लागल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.

नुकत्याच पक्षप्रवेश करणाऱ्या अमृता पवार यांनी भाजपऐवजी माजी आमदार कदम यांच्या गटाशी जुळवून घेतल्याने भाजपही एकसंघ नसल्याचे स्पष्ट दिसते. नवे गट-तट उदयाला येणार असल्याने निफाडच्या राजकारणाला नवा आयाम देणारी पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक ठरणार आहे.

सहा जूनला सुनावणी...

आमदार बनकर यांच्या राजकीय डावपेचाला माजी आमदार कदम यांनी मात केल्याचे सध्या स्थिती आहे. पिंपळगाव बसवंत, पालखेड, तारूखेडले, चांदोरी, करंजगाव या सहा सोसायट्याचे संचालक पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. कारण याबाबतची सुनावणी ६ जूनला होणार असल्याचे न्यायालयाने सुधारीत आदेश काढले आहे. २८ एप्रिलला मतदान होणार असल्याने त्या ७८ संचालकांची नावे मतदार यादी समाविष्ट होण्याची कोणतीच शक्यता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT