Drugs Crime esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: ‘त्या’ कारखान्यातील कामाबाबत कांबळे अनभिज्ञ; पोलिस चौकशीतून आले समोर

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : शिंदे गावात गेल्या महिन्यात मुंबईच्या साकीनाका व नंतर नाशिक पोलिसांनी एमडी ड्रग्जचे दोन कारखाने उद्‍ध्वस्त केले होते. या कारखान्यांशी ज्याच्या नावे भाडेकरार करण्यात आलेला होता, तो कारखान्यात नेमके काय काम केले जाते, याबाबत अनभिज्ञ असल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. समाधान कांबळे याच्या नावे दोन्ही कारखान्यांचा भाडेकरार करण्यात आलेला होता.

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ४ ऑक्टोबरला शिंदेगावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीवर छापा टाकून तब्बल ३०० कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. (Nashik MD Drug Case Kamble Do not know about shinde gaon factory work crime news)

नाशिक शहर पोलिसांनी ७ ऑक्टोबरला शिंदेगावातील गुदामावर छापा टाकून सुमारे सहा कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या दोन्ही कारखान्यांचा संबंध ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्याशी असल्याचे समोर आले. मात्र, दोन्ही कारखान्यांशी असलेला भाडेकरारनामा हा समाधान कांबळे (रा. नाशिक रोड) याच्या नावे करण्यात आलेला होता.

साकीनाका पोलिसांनी याच प्रकरणाशी संबंधित असल्याने कांबळे, उमाशंकर यादव या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांना चौकशीतून ठोस माहिती मिळाली नाही. कांबळे नाशिकमध्ये आला असता, नाशिक शहर गुन्हे शाखेच्या तपासी पथकाने त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.

भूषणशी होती ओळख

समाधान कांबळे याची ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्याशी ओळख होती. बांधकामाच्या सेंट्रिंगचे काम करणाऱ्या कांबळे याला भूषण याने पैशांची मदत केलेली होती. गेल्या वर्षी शिंदेगावातील कारखाना सुरू करण्यापूर्वी भूषण याने कांबळे याच्याशी संपर्क साधून त्याच्या नावे भाडेकरार करण्यासाठी त्यास राजी केले.

तसेच, जागामालकाला देण्यासाठी काही धनादेशही कांबळे याचेच घेतले होते. दुसऱ्या गुदामाबाबतही भूषण याने कांबळे याच्याच नावाने भाडेकरार केला. परंतु, भूषण हा त्या कारखान्याच्या जागेत काय काम करणार आहे, याची कोणतीही माहिती नव्हती, अशी माहिती कांबळे याने पोलिस चौकशीत सांगितले.

ललितसोबत एक दिवस

ड्रग्जमाफिया ललित पाटील हा गेल्या महिन्यात ससून रुग्णालयातून पसार झाल्यावर एक दिवस नाशिकमध्ये आला होता. त्यावेळी भूषणच्या माध्यमातून त्याने कांबळे यास बोलावून घेत त्याची कार घेऊन फिरला.

दिवसभर त्याच्याबरोबर असताना कांबळे यास त्याच्या वागण्या-बोलण्यातून संशय आला. त्यामुळे त्याने ललित यास काहीतरी कारण सांगून पोबारा केला. चार-पाच दिवसांनी शिंदेगावातील कारवाई झाल्यावर कांबळे यास पाटील बंधूंचा उद्योग समजला. त्यानंतर कांबळे स्वत:च साकीनाका पोलिसांसमोर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT