Dr. Subhash Bhamare esakal
नाशिक

Nashik News : बागलाण, मालेगावच्या पर्यटनाला मिळणार चालना : खासदार भामरे

Nashik News : या निधीमुळे समाविष्ट गावातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण व मालेगाव तालुक्यासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून दोन कोटी ४३ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Nashik MP Bhamre Tourism of Baglan Malegaon marathi news)

डॉ. भामरे म्हणाले, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवून घेतला. या निधीमुळे समाविष्ट गावातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा व विकासकामे होणार आहेत. त्यामुळे या गावांतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना पर्यटनवाढीसाठी मदत होणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.  (latest marathi news)

या गावांचा समावेश

बागलाण तालुक्यातील देवळाणे, बिजोटे, ढोलबारे, ताहाराबाद, तळवाडे दिगर, पठावे दिगर, नळकस, तिळवण, काकडगाव येथे सभामंडप बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख, तर मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे शिवतीर्थ उद्यान सुशोभीकरण ३० लाख, मालेगाव कॅम्प महादेव मंदिर परिसरात प्लेव्हर ब्लॉक बसविणे ५० लाख, वडगाव येथे पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप व इतर अनुषंगिक कामांसाठी ६३ लाख याप्रमाणे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Akola News : अकोट मध्ये ‘एमआयएम’ कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून जितेन बरेठिया; भाजप नेत्याच्या पुत्राच्या सहभागाने पुन्हा राजकीय भूकंप!

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना 'फ्लेक्सबाजी' करण्यास सक्त मनाई; शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पक्षाचे कडक आदेश!

Pune Crime : विश्रांतवाडी बस थांब्यावर पुणे पोलिसांची सापळा रचून कारवाई; कुख्यात गुंड अरबाज शेख अटक!

Supriya Sule : "पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असणार"- खासदार सुप्रिया सुळे!

SCROLL FOR NEXT