Nashik Municipal Corporation Fund  esakal
नाशिक

Nashik Municipal News : नाशिक मनपाचे अंदाजपत्रक होणार विलंबाने सादर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारीअखेर होणार असल्याने त्याअनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परिणामी महापालिकेचे अंदाजपत्रक आता विलंबाने स्थायी समितीवर सादर केले जाणार आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक प्रथेप्रमाणे आयुक्त स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समितीमार्फत नव्या योजनांचा समावेश करून महासभेला अंदाजपत्रक सादर केले जाते. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा स्थायी समितीवर अंदाजपत्रक मंजूर होऊन अंमलबजावणी सुरू होते.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

परंतु यासाठी जवळपास मे महिना उजाडतो. मात्र, असे असले तरी प्रशासनाकडून मात्र अंमलबजावणी सुरू होते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा व खर्चाचा आढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक मंजूर केले जाते. यंदा मात्र प्रशासकीय राजवट असल्याने मार्च महिन्याच्या आत अंदाजपत्रक मंजूर करून अंमलबजावणी करण्याचे नियोजन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

३० जानेवारीला स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्याने त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे आता ३० जानेवारी ऐवजी ४ फेब्रुवारीनंतर अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT