nashik municipal Corporation election postponed marathi news
nashik municipal Corporation election postponed marathi news 
नाशिक

नाशिक मनपाची पोटनिवडणूक लांबणीवर; मतदारयादी नव्याने जाहीर होणार

विक्रांत मते

नाशिक : पंचवटी विभागातील प्रभाग ४ (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी राबविलेला मतदारयाद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने रद्द करताना नव्याने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. 

नव्याने मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार

पंचवटीच्या फुलेनगर भागातील प्रभाग ४ (अ) च्या नगरसेविका शांताबाई हिरे यांचे अकस्मात निधन झाल्याने रिक्तपदावर पोटनिवडणूक घेतली जाईल. त्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. १ जानेवारी २०१९ रोजीच्या विधानसभा मतदारयादीवरून प्रारूप मतदारयाद्या तयार करून ९ मार्च २०२०ला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागवून २३ मार्चला अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द केल्या जाणार होत्या. परंतु कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने १७ मार्च २०२०ला मतदारयादीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२० या आर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदारयादी २५ सप्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. सर्व नवीन मतदारांचा यादीत समावेश होणे अपेक्षित असल्याने यापूर्वीचा मतदारयादीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पोटनिवडणुकीसाठी आता नव्याने मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

नव्या मतदारांना हक्क बजावण्याची संधी 

पोटनिवडणुकीसाठी आता नव्याने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. नव्या मतदारयाद्या नवीन मतदार नोंदणी केलेल्या मतदारांच्या नावांसह अद्ययावत असतील. त्यामुळे नवीत मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT