plastic waste 
नाशिक

प्लॅस्टिकपासून भागणार इंधनाची गरज! महापालिका उभारणार डिझेल प्रकल्प

विक्रांत मते

नाशिक : वाढत्या प्लॅस्टिकच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील यंत्रांची इंधनाची गरज भागविण्यासाठी महापालिकेतर्फे डिझेल प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी पनवेल येथील एका खासगी कंपनीशी बोलणी सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. प्लॅस्टिक कचरा संकलित करताना ग्रामीण भागातून प्लॅस्टिक संकलित केले जाणार आहे. 

प्लॅस्टिकपासून डिझेलनिर्मिती

महापालिकेच्या माध्यमातून शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून घनकचरा संकलित केला जातो. कचरा गोळा करण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. पाथर्डी येथील डेपोत कचरा संकलित केला जातो. कचऱ्यातून प्लॅस्टिक पिशव्या, वस्तू बाजूला करून नाशिक वेस्ट मॅनेजमेंटमार्फत प्लॅस्टिकपासून जळाऊ इंधन तयार केले जाते. इंधन तयार करणाऱ्या प्रकल्पाची क्षमता एक टन असली, तरी रोज ५०० ते ६०० लिटरएवढे इंधन तयार केले जाते. तयार इंधनाचा वापर मृत जनावरे जाळण्यासाठी केला जातो. आता त्याच्या जोडीलाच महापालिका प्लॅस्टिकपासून स्वतंत्र डिझेलनिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. पनवेल येथील एका खासगी कंपनीसोबत सहकार्य करार केला जाणार आहे. पनवेल येथील प्रकल्पात सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे व परिसरातील महापालिका हद्दीत तयार होणारे प्लॅस्टिक संकलित करून त्यापासून डिझेल तयार केले जाते. वाहनांमध्ये वापरण्यायोग्य तयार होणारे डिझेल नसले, तरी त्याचा वापर इंजिनिअरिंग कंपन्यांमधील यंत्रासाठी होत असल्याने त्याच धर्तीवर नाशिक महापालिकाही डिझेल तयार करण्याचा प्रकल्प उभारणार आहे.

५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या वस्तूंचे विघटन करून डिझेल इंधन तयार केले जाणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातून प्लॅस्टिक संकलित केले जाणार आहे. शहरापासून जवळ असलेल्या त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, पिंपळगाव बसवंत, भगूर या शहरांमधून प्लॅस्टिक जमा केले जाणार आहे. 

प्रकल्पात तयार होणाऱ्या डिझेलचा वापर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये होईल. पर्यावरण संतुलनाबरोबरच या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे साधन तयार होईल. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 

शहरात कचरा संकलनाचे प्रमाण 

मल्टी-लेयर पॅकेजिंग २०- ३० टक्के (चिप्स, चॉकलेट्स, बिस्किट्स) 
काचेच्या बाटल्या ४५ टक्‍के (मद्य, शीतपेये) 
प्लॅस्टिकचे पाउच ३०- ५० टक्‍के (दूध, पाणी) 
पीईटी बाटल्या ९० टक्के (तेल, औषधे, पाणी, मद्य) 
एचडीपीई बाटल्या ७०- ८० टक्‍के (शॅम्पू, कंडिशनरच्या बाटल्या) 
टेट्रा पॅक ४० टक्‍के (ज्यूस, दूध) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT