drowing death esakal
नाशिक

Nashik News : पतंगाच्या मोहापायी 13 वर्षीय मुलाने गमावला जीव; 3 दिवसानंतर नदीपात्रात आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

येवला : तालुक्यातील मुखेड येथे शनिवार (ता.१७) रोजी मुखेड येथील १३ वर्षीय मुलाचा गोई नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृत मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मुलाचा मृत्यू पतंगाच्या मोहासाठी झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. रोहित माळी (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.

तालुक्यात मकरसंक्रांत सणाचे विशेष महत्त्व असून येवला शहर व तालुक्यात संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. गोई नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील मुखेड येथे शनिवारी घडली. येथील रोहित हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना शनिवारी रोहितचा मृतदेह मुखेड येथीलच गोई नदीपात्रात तरंगताना आढळून आला.

शेजारीच असलेल्या पतंग व काठीवरून रोहितचा मृत्यू पतंगाच्या मोहासाठी झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT