crime news esakal
नाशिक

Nashik News : जगताप आत्महत्त्याप्रकरणातील मणियारला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी फाटा येथील अनमोल नयनतारा सोसायटीतील जगताप दामत्याच्या आत्महत्या प्रकरणात इंदिरानगर पोलिसांनी युनूस मणियार या मुख्य संशयितास अटक केली आहे. मयत गौरव आणि संशयित युनूस हे व्यवसायात भागीदार असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

गेल्या रविवारी (ता. १८) रात्री गौरव व नेहा जगताप यांनी राहत्या घरात गळफास घेतला होता. तत्पूर्वी डायरीत सुसाईड नोट लिहून युनूस मणियार (रा. भारत नगर, वडाळा गाव) याने पैशांचा तगादा लावून धमकी दिल्याचे नमूद केले होते. तसेच मयूर बैरागी (२५, रा. सातपूर कॉलनी) याने नेहाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही उल्लेख केला होता. दरम्यान, गुरुवारी इंदिरानगर पोलिसांनी बैरागी याला घरातून अटक केली होती. .

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांना नेहा व गौरवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित वडाळा रोडवर असल्याची माहिती (ता.२४) मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने मणियार याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून (ता. २५) न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. मयत गौरव व युनूस हे घटनेच्या पूर्वीपासून एका व्यवसायात भागीदार होते. त्यातून त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत होते. आता पोलिस युनुसच्या बँक खात्याची माहिती घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'आरोग्‍य विभागात दिवाळीऐवजी शिमगा'; सेवक, सहाय्‍यकांचे पगार थकले; कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा..

Soybean Guaranteed Price:'सोयाबीन हमीभाव केंद्रासाठी खर्डाभाकरी आंदोलन'; कऱ्हाडला शेकाप, रासप, बळीराजा शेतकरी संघटनेची संयुक्तपणे घोषणाबाजी

Festive Makeup For Bride: लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे? मग लक्ष्मीपूजनासाठी करा असा झटपट मेकअप!

गावगुंड होणार तडीपार! झेडपी, महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर पोलिसांनी तयार केली रेकॉर्डवरील ६७०० गुन्हेगारांची यादी; अनेकांवर ‘एमपीडीए’चीही कारवाई

मोठी बातमी! राज्यातील पगारावरील एक लाख शिक्षक २३ नोव्हेंबरला देणार ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात,...

SCROLL FOR NEXT