nylon manja stock esakal
नाशिक

Nashik News : नायलॉन मांजा विक्रेत्यांना थेट तडीपारीची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी गेल्या वर्षी गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांना यंदा थेट तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या माध्यमातून मांजाविक्रीस आळा बसेल, अशी अपेक्षा पोलिस यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातलेली आहे. तरीदेखील बाजारात नायलॉन मांजा विक्री होत आहे. गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर मांजाची विक्री झाली होती.

पोलिसांनी गुन्हे दाखल करत सूचना देऊनही विक्रेते मनमानी करत यंदाही नायलॉन मांजाची सर्रास विक्री करत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत लाखो रूपये किमतीचा मांजा जप्त केला आहे. तरी देखील विक्रेते पोलिसांच्या कारवाई आणि सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर होऊन दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे.

याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून, गेल्या वर्षी व यंदाही ज्या मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना संक्रांतीपूर्वी पंधरा दिवस थेट तडीपारीची नोटीसच पोलिसांकडून पाठविण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस ठाण्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानंतर सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विक्रेत्यांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त यांची भेट घेत तडीपारीची कारवाई टाळण्याची विनंती केली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतला जातो, याकडे विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याचा विचार करता, गेल्या वर्षी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेले आठ, तसेच काही दिवसांपूर्वी कुंभारवाडा भागात करण्यात आलेल्या कारवाईतील एका संशयितास भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्या तडीपारिचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.

यांना बजावली नोटीस

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाजिम सलीम शहा (नानावली), आसिफखान गुलाममोहम्मद खान (नाईकवाडीपुरा), आदेश कैलास काथवटे (काझीगढी), विलास प्रभाकर ठोंबरे (बुधवार पेठ), देवेश शैलेश वैद्य (टाकसाळ लेन), अरबाज फिरोज शेख (नाईकवाडीपुरा), मदिना सय्यद (कथडा), दानिश इसाक अत्तार (मुलतानपुरा), रोहित रमेश साळवे (कुंभारवाडा) यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT