NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC News : अपघातमुक्त शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा; उपाययोजना सुचवून नियमावली

Nashik News : अपघातमुक्त शहर करण्यासाठी महापालिकेच्या ट्रॅफिक सेलमार्फत स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर वाढतं असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने शहरात खासगी वाहनांची संख्या वाढतं आहे. त्यामुळे अपघातांची संख्यादेखील झपाट्याने वाढतं आहे. अपघातमुक्त शहर करण्यासाठी महापालिकेच्या ट्रॅफिक सेलमार्फत स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार केला जात आहे. (nmc Independent Transport Plan for Accident Free City)

यात अपघातप्रवण क्षेत्रात अपघाताची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे, पादचाऱ्यांना भयमुक्त वातावरणात रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना सुचवून नियमावलीदेखील केली जाणार असल्याची माहिती ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवींद्र बागूल यांनी दिली. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना इमारतींची संख्या वाढत आहे.

प्रत्येक घरात किमान एक दुचाकी व एक चारचाकी आहे. काही घरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. मात्र वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगच्या समस्यादेखील वाढल्या आहेत. पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. जुने नाशिक व शहरातील इतर गावठाणामध्ये ही समस्या अधिकच गंभीर आहे.

गावठाणातील वाहने शालिमार, द्वारका या भागात पार्क केली जातात. यावरून शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. वाहनांची संख्या वाढत असली तरी रस्त्यांची संख्या व आकारमान मात्र वाढत नाही. शहरात भुयारी मार्ग व उड्डाणपुलांची संख्यादेखील समाधानकारक नाही. अशा परिस्थितीमध्ये अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या ट्रॅफिक सेलने वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. (latest marathi news)

यातून वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच अपघातमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवींद्र बागूल यांनी दिली. पाचशे मीटर अंतरामध्ये तीन वर्षात सलग पाच अपघात झाले किंवा अपघातात दहा व्यक्तींचा मृत्यू झाला तर अशा ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित केले जातात. शहरात असे २६ अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट आहेत.

ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी गतिरोधक बसविण्याबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, सूचना फलक लावणे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र आता अपघातमुक्त ब्लॅक स्पॉट करण्यासाठी त्या ठिकाणांचा अभ्यास केला जाणार आहे. किती अपघात झाले, अपघाताचा प्रकार कसा होता, पादचाऱ्याचे अपघात किती झाले, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ट्रॅफिक सेलचे नियोजन

- सार्वजनिक वाहतुकीचा वापर

- वाहनतळांची निमिर्ती

- वाहतूक बेटांचे सुशोभीकरण

- सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी

- रस्तावर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग टाकणे.

- सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टरची उभारणी

- उड्डाणपूल, पूल उभारणे.

- गर्दीच्या वेळी मार्गामध्ये बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT