MPCB esakal
नाशिक

Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

Nashik महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेताना शेकडो उद्योगांनी ऑनलाइन बँक गॅरंटी अपलोड करत परवानगी मिळवली खरी, पण प्रत्यक्षात बँक गॅरंटीचे कागदपत्रे कार्यालयात जमा न करता ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेताना शेकडो उद्योगांनी ऑनलाइन बँक गॅरंटी अपलोड करत परवानगी मिळवली खरी, पण प्रत्यक्षात बँक गॅरंटीचे कागदपत्रे कार्यालयात जमा न करता ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. यामुळे आता बँक गॅरंटी जमा करा अन्यथा परवानगी रद्दची नोटीस एमपीसिबीने बजावली आहे. त्यामुळे उद्योगांनी बँक गॅरंटी लवकर जमा करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. (Nashik Notice regarding bank guarantee to industries by MPCB marathi news)

उद्योग उभारताना सत्तावीसपेक्षा जास्त सरकारी विभागाची परवानगी लागते. त्यापैकी सर्वात पहिले व अतिशय महत्त्वाची परवानगी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची असते. मंडळ परवानगी देताना उद्योगातून उत्पादन करताना पाणी, वायू वा ध्वनी प्रदूषण होऊ नये तसेच ज्या ठिकाणी उद्योग आहे त्या परिसरातील रहिवाशांना कुठलाही आरोग्याचा धोका होऊ नये, म्हणून विविध उपाययोजनांच्या सूचना देते.

एखादी दुर्घटना झालीच तर त्या उद्योगाने परवानगी घेताना भरलेली बँक गॅरंटी डिपॉझिट जप्त करून भरपाई केली जाते. त्या अनुषंगाने नाशिकसह विविध जिल्ह्यांतील उद्योगांनी ऑनलाइन बँक गॅरंटी अपलोड करत परवानगी मिळवली खरी, पण अनेक महिन्यांनंतरही अनेकांनी प्रत्यक्षात ती कार्यालयामध्ये जमाच केली नाही. याबाबत अनेकवेळा सूचना देऊनही उद्योगांनी राजकीय वजन वापरून वेळ मारून नेल्याचे सांगितले जात आहे. (latest marathi news)

''उत्तर महाराष्ट्रातील किमान पंधराशेपेक्षा जास्त उद्योगांना पहिल्या टप्प्यात बॅंक गॅरंटीबाबत नोटीस बजावली आहे. अजून काही उद्योगांना देण्याची प्रक्रीया सुरू करणार आहे. बँक गॅरंटी जमा न करणाऱ्यांवर कारवाई होईल.''- लिंबाजी भड, प्रादेशिक अधिकारी, नाशिक

''उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून मंडळातर्फे काही उपाययोजनांच्या सूचना देत परवानगी दिली जाते. त्यासाठी उद्योगाकडून बँक गॅरंटी घेतली जाते. त्यातील बहुतांशी उद्योग चांगल्याप्रकारे उपाययोजना करत असल्याने अशा आस्थापनांना बँक गॅरंटी परत केली जाते.''- उपप्रादेशिक अधिकारी, अमर दुर्गुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT