Poor condition of public toilets esakal
नाशिक

Nashik News : जुने शौचालय दुरुस्त होत नाही, नवीन बांधले जात नाही

Nashik : प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील अनेक शौचालय शेवटच्या घटका मोजत असताना काही व्हेंटीलेटरवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा : सुदर्शन सारडा

Nashik News : प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील अनेक शौचालय शेवटच्या घटका मोजत असताना काही व्हेंटीलेटरवर आहे. मात्र संबंधित मुदत संपलेले शौचालय निर्लेखित करण्याची गरज असूनही प्रशासनाकडे तसे वेळापत्रकच नसल्याने ओझरकरांनी न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. ओझरला अनेक घरात शौचालय नसल्याने नागरिकांना बाहेर जावे लागते. (Nashik Old public toilet bad condition in ozar marathi News )

अनेक जुन्या शौचालयाची स्थिती बदललेली नाही. जुन्या बांधकामांच्या आणि कुजलेल्या बांधून तीस चाळीस वर्ष झाली परंतु त्याला नवीन करण्याचे मूर्त रूप मिळण्यासाठी टेबलावर फिरत आहे. प्रत्यक्ष यावर कधी उपाययोजना होणार हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे. प्रत्येकाच्या घरात शौचालय हवे असताना जागे अभावी ते शक्य जरी होत नसले तरी सार्वजनिक ठिकाणी त्यात बदल, दुरुस्ती नवीन करणे ही कामं मात्र लांबल्याने उघड्यावरच घाण केली जाते.

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेत ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या घरात शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेत उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय मोहीम आहे. नगर परिषदेने ६०० शौचालया मागणी करत आवाहान केले त्यात २०० जणांनी अर्जही केले. पण त्यापैकी १५० अर्ज वैध आहेत. योजना पोहोचण्यात कुठल्या निकषांचा अडसर आहे. हे मात्र गुलदस्त्यात आहे. (latest marathi news)

आकडेवारी किती

एकूण सार्वजनिक शौचालय : ३० -३५

जुनाट अन् अत्यंत खराब शौचालय: ०९ ते १०

''दोन वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय येथील महिला शौचालय बाबत अनेक अर्ज केले.पूर्वीच्या काळी जसे उघड्यावर जावे लागे, तसेच आजही आहे.येथे सेफ्टी टँकचे ढापे नाही,स्वच्छता नाही.एकतर ते नवीन करा अन्यथा काढून टाका ही मागणी करूनही नगरपरिषद कुठलीही दखल घेत नाही.सुरू असलेला गलथानपणा थांबावा हीच अपेक्षा आहे.''-ॲड.केशव नारायण आहेर (ओझर)

''मी स्वतः पाहणी केली असून तसा दुरुस्त अहवाल दिला आहे.गाव व उपनगरातील सुरवातीस केलेल्या दुरुस्त्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत ६-७ ठिकाणी तातडीने उपयोजना करणे आहेत. तसा प्रस्ताव बांधकाम विभागास दिला आहे.त्यांनी मंजूर केल्यावर काम तातडीने केले जाईल.''-प्रतीक उंबरे (स्वच्छता निरीक्षक,ओझर नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT