Onion traders of the district present during the meeting held at the railway station. esakal
नाशिक

Nashik Onion : नोव्हेंबरपासून रेल्वेने कांद्याची लोडिंग; व्यापाऱ्यांची बैठक

Nashik Onion : नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून नोव्हेंबरपासून कांद्याच्या लोडिंगला सुरुवात करू, असे आश्‍वासन व्यापाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून नोव्हेंबरपासून कांद्याच्या लोडिंगला सुरुवात करू, असे आश्‍वासन व्यापाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. रेल्वे प्रशासकीय अधिकारी, वाणिज्य अधिकारी व व्यापाऱ्यांची नाशिक रोड रेल्वेस्थानकात नुकतीच बैठक झाली, यात हा निर्णय झाला. नाशिक रोड स्थानकावर मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद मालखेडे, भुसावळ मंडळचे वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांनी लासलगाव, मनमाड आणि अंकाई किल्ला परिसरातील कांदा व्यापाऱ्यांबरोबर महत्त्वाची बैठक घेतली. (Onion loading traders meeting by rail from November )

बैठकीत कांद्याच्या लोडिंगसंदर्भात विविध प्रकारे चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि रेल्वेकडून हव्या असणाऱ्या मदतीवर चर्चा झाली. या वेळी व्यापाऱ्यांनी नोव्हेंबरपासून कांद्याची लोडिंग सुरू करून रेल्वेला महसूल मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. हा कांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाना व इतर ठिकाणी पाठविला जाणार आहे. कांद्याच्या लोडिंगसंदर्भात लासलगाव, कसबे-सुकेणे या ठिकाणी पाहणी करून मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी या संदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निरीक्षणाद्वारे स्थानकांवरील आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT