onion price Sakal
नाशिक

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या भावात पाचशे रुपयांची उसळी

महेंद्र महाजन

नाशिक : पश्‍चिम बंगाल, दिल्लीच्या बाजारपेठेत दक्षिण भारतातून पाठविलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच पावसामुळे राजस्थानमधील कांद्याचे नुकसान झाल्याने सोमवार (ता. २०)पासून नाशिकच्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. परिणामी, तीन दिवसांत कांद्याच्या भावाने क्विंटलला पाचशे रुपयांनी उसळी घेतली.


चाळींमध्ये साठविलेल्या उन्हाळ कांद्याला भाव मिळेल की नाही, अशी स्थिती तयार झाली असताना, शेतकऱ्यांसाठी मागील तीन दिवस चांगले राहिले. दक्षिणेतील पावसामुळे कांद्याचे नुकसान होण्याचे यंदाचे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा पावसाची चिन्हे दिसत नसल्याने साठवलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागण्याची चिन्हे होती. अशा परिस्थितीत मुंबईत गुरुवारी (ता. २३) कांद्याला क्विंटलला सरासरी एक हजार ८०० रुपये भाव मिळाला. सोमवारी (ता. २०) दीड हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली होती. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत क्विंटलला पाचशे रुपयांनी भावात वाढ झालेल्या बाजारपेठांमध्ये सटाणा, पिंपळगाव बसवंत, उमराणेचा समावेश आहे. मनमाडमध्ये ४००, नाशिकमध्ये ४५०, देवळ्यात ४७५, नामपूर आणि येवला, कळवणमध्ये ३००, तर मुंगसेमध्ये २७५, लासलगावमध्ये १५० रुपयांनी भाव वधारले. यंदा राजस्थानमध्ये कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी असले, तरीही पुढील महिन्यात बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याची माहिती देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. परिणामी, देशातील व्यापारी नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या खरेदीकडे वळाले आहेत. देशातंर्गत मागणी वाढल्याने कांद्याची निर्यात ‘स्लो-डाउन’ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत खरेदी केलेल्या कमी भावाचा कांदा निर्यातदार परदेशात पाठवीत आहेत. हे प्रमाण एकूण निर्यातीच्या ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.


आयातदार ‘वेट ॲन्ड वॉच’मध्ये

अरब राष्ट्रासह सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये आयातदारांनी कांद्याच्या भावात झालेली वाढ पाहून ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. हॉलंडचा कांदा ३५ रुपये किलो भावाने पोच देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, भारतीय कांद्याच्या तुलनेत हॉलंडचा कांद्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. चीनमधील नवीन कांदा बाजारात येऊ लागला असून, व्यापाऱ्यांनी ३० रुपये किलो भावाने कांदा पोच देण्यास सुरवात केली आहे. इजिप्तचा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. पाकिस्तानचा नवीन कांदा पुढील महिन्यात बाजारात येईल. पाकिस्तानमधील कांद्याचे उत्पादन २० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे.



कांद्याच्या भावाची स्थिती
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ आज सोमवारी (ता. २०)
येवला १ हजार ९५० १ हजार ६५०
नाशिक १ हजार ८०० १ हजार ३५०
लासलगाव २ हजार ४० १ हजार ८९०
कळवण २ हजार १ हजार ७००
मनमाड २ हजार १ हजार ६००
सटाणा २ हजार १५० १ हजार ६५०
पिंपळगाव २ हजार १५१ १ हजार ६५१
देवळा २ हजार १७५ १ हजार ७००
उमराणे २ हजार १ हजार ५००
नामपूर २ हजार १ हजार ८००
मुंगसे १ हजार ९५० १ हजार ६७५


तुर्कस्थानचा नवीन कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. हा कांदा श्रीलंकेत २६ रुपये किलो भावाने पोच देण्याची तुर्कस्थानमधील व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली. सद्यःस्थितीत श्रीलंकेत कांद्याची आवश्‍यकता नाही, पण तुर्कस्थानपेक्षा भारतीय कांदा ग्राहक विकत घेतील, या अनुभवामुळे श्रीलंकेतील आयातदारांनी नाशिकमधील व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या भावाचा अंदाज घेण्यास सुरवात केली आहे.
- विकास सिंह, कांद्याचे निर्यातदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT