rajesh tope esakal
नाशिक

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : बुधवारी (ता.२१) महापालिका, शासन स्तरावर यंत्रणा असतानाही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दुर्देवी घटना घडली, प्रशासकीय व्यवस्थेच्या त्रुटींमुळेच दुर्घटना घडून त्यात नाहक गोरगरीब २२ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. समिती आधी या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून पण या उच्चस्तरीय चौकशी समितीत नेमके कोण कोण असणार आहे. जाणून घेऊ सविस्तर..

चौकशी समितीत कोण कोण असणार ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

पुनरावृत्ती न होण्यासाठी (SOP)ठरविणार

आधी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती घटनेची चौकशी करेल. यानंतर या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून (SOP)एसओपी ठरवली जाईल. चौकशी समितीकडून मिळालेल्या सूचना SOP म्हणून लागू करु, या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं राजेश टोपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: संघर्ष पुन्हा भडकला! अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; १४ जण ठार, ७८ लोक जखमी, पाच प्रांतांवर बॉम्बहल्ले

ZIM vs BAN 2nd ODI: एका भावाने भारताला रडवले, दुसऱ्याने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले... झिम्बाब्वेने तगडे लक्ष्य उभे केले...

Nashik Dam Rain : तीन दिवसांच्या मुसळधारेने धरणांना नवसंजीवनी; गंगापूर ६८ टक्क्यांवर, दारणा निम्मे भरले

IND vs ENG 4th T20I: ब्रिस्टलमध्ये पावसाची किती शक्यता? भारत-इंग्लंड चौथ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो ब्रिस्टलचा हवामान अंदाज?

३ मिनिटांवर हॉस्पिटल पण पोहोचायला १५ मिनिटं लागली... सुचित्रा यांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग! आदेशची हार्ट लाइन ओपन केली होती…

SCROLL FOR NEXT