nashik accident  sakal
नाशिक

Nashik News : धोंड्यासाठी माहेरी आली लेक मात्र विजेचा धक्का लागल्याने आईसह झाला मृत्यू

Nashik News : घटनेमुळे संपूर्ण ओझर शहरात शोककाळा

सकाळ डिजिटल टीम

Nashik News : नाशिकमधून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे धोंड्यासाठी माहेरी आलेल्या मुलाचा तिच्या आई बरोबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये हा प्रकार घडला आहे. दत्तनगर परिसरातील मुलगी बऱ्याच दिवसांनी आपल्या घरी आली होती. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.

मुलीच्या माहेरच्या घरी एक पेरूचे झाड आहे.पेरू खाण्यासाठी मुलगी गच्चीवर गेली होती. यावेळी पेरूच्या झाडाला लागलेले पेरू तोडतांना उच्चदाबाच्या तारांना तिच्या हातातील लोखंडी रॉड लागला. आणि मुलीला विजेचा जोरदार धक्का बसला.

तर विजेचा प्रवाह गच्चीवरील पाण्याच्या टाकीत उतरला. यामुळे पाण्याची टाकी फुटली आणि पाण्याचा करंट बसल्याने आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणचा मोठा आवाज ऐकून जावयाने गच्चीवर धाव घेतली. मात्र त्यांना पाण्यातील करंटने बाहेर फेकले आणि ते बचावले.

घटनेची माहिती मिळाल्याच मुलगा घराकडे परतु लागला. यावेळी त्याचा अपघात झाला. अपघातामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण ओझर शहरात शोककाळा पसरली आहे. आकांशा रणशुर आणि मीना सोनवणे अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT