Kites for sale in a market with scenes from a South Indian film.
Kites for sale in a market with scenes from a South Indian film. esakal
नाशिक

Makar Sankranti 2023 : नाशिककरांना ‘पुष्पा’ पतंगची भूरळ!; यंदा पतंग बाजार तेजीत, मागणीही वाढली

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : साउथ इंडियन ‘पुष्पा’ चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. सामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकारी देखील पुष्पाच्या नृत्यावर थिरकत होते. त्याची लोकप्रियता अजूनही संपलेली नाही. यंदा संक्रांतीनिमित्त बाजारात दाखल झालेल्या पतंगवर पुष्पा चित्रपटाची छाप बघावयास मिळत असून अन्य सुपरहिट साउथ इंडियन चित्रपटांच्याही पतंग बाजारात दाखल झाल्या आहे. (Nashik people get Pushpa kites kite market booming demand increased Nashik Makar Sankranti 2023)

चंदेरी नगरीत सध्या साउथ इंडियन चित्रपटांचे हिंदी रूपांतरित चित्रपट धूम घालत आहे. काही दिवसांपूर्वी चंदन तस्करीवर आधारित प्रसारित ‘पुष्पा’ चित्रपटातील नायक पुष्पाच्या नक्कलेवर सगळे थीरकले. पुष्पासह केजीएफ, ‘आरआरआर’ या चित्रपटांनी चित्रपट नगरीत मोठी धूम केली होती. याच प्रकारच्या अनेक चित्रपटांचा सध्या बोलबाला असून त्यांच्या लोकप्रियतेतून यंदाचा पतंगोत्सवही सुटलेला नाही.

दरवर्षी संक्रांत निमित्त बाजारात येणाऱ्या पतंगवर वर्षभरातील लोकप्रिय घटना तसेच सामाजिक आणि मनोरंजन दुनियेतील नावीन्यावर आधारित संदेश, दृश्यांची पतंगीवर छाप असते. नागरिक देखील याकडे आकर्षित होताना दिसून येतात. यंदाच्या पतंगोत्सवासाठी बाजारात दाखल झालेल्या पतंगवर देखील या चित्रपटांच्या दृश्यांची छाप असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीला अर्थात पतंगोत्सवास काही दिवस शिल्लक राहिल्याने इतरही पतंगची मागणी वाढली आहे. पतंगाच्या दुकाने रंगबिरंगी, विविध प्रकार, कागदाच्या पतंगने सजल्या आहे. ६ इंच ते ४ फूट पतंग विक्रीस आहे. २ रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पतंग विक्री होत आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

पतंगचे प्रकार

रामपुरी, हॅप्पी न्यू इयर २०२३, आय लव माय इंडिया, फ्री फायर, प्लॅनेट रायडर, मटका, मार्बल, कापडी, प्रिंटेड मटका, येवला धोबी प्रिंटेड, पारंपारिक कागदी, स्पायडरमॅन, कार्टून.

येथून येतात पतंग

उत्तर प्रदेश येथील रामपूर, बरेली, कानपूर तसेच गुजरात, सुरत विविध प्रकारच्या पतंग बाजारात विक्रीस येत असतात. गुजरात सुरत पेक्षा रामपूर आणि बरेली येथील पतंगना अधिक मागणी आहे.

"संक्रांत निमित्ताने विविध प्रकारच्या आकर्षक पतंग बाजारात दाखल झाल्या आहे. साउथ इंडियन चित्रपटाचे दृश्य असलेल्या पतंग प्रथमच बाजारात विक्रीस आल्या आहे. महागाईमुळे दरांमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. माल येण्याचे प्रमाणही कमी आहे. त्याचाही परिणाम दरांवर झाला आहे." - नवाज शेख, पतंग व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT