Panchvati Peth Road work in progress. esakal
नाशिक

Nashik News : पावसाळ्यापूर्वी पेठ रोड पूर्णत्वाची आस; एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक

Nashik News : गेल्या काही वर्षात दुरवस्थेमुळे कायम चर्चेत असलेल्या पेठ रोडवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता काँक्रिटीकरण कामकाज १० मार्चला सुरू झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या काही वर्षात दुरवस्थेमुळे कायम चर्चेत असलेल्या पेठ रोडवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता काँक्रिटीकरण कामकाज १० मार्चला सुरू झाले आहे. सदर कामकाज हे टप्पाटप्प्यात सुरू केले असून गजपंथ वळण ते पाटापर्यंतचे एकेरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. एकेरी मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर मध्ये अनेक ठिकाणी रस्ता सोडून देत. (Nashik Peth Road expected to be completed before monsoon)

काही अंतर सोडत काही ठिकाणी रस्ता बनविण्यात आला आहे. यातून मार्गक्रमण करताना दुचाकी, चारचाकी आदी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे पेठ रोडच्या नागरिकांचे रस्ता कामाच्या पूर्णत्वाकडे लक्ष लागून आहे. पेठ रोड गुजरातकडे जाण्याचा महामार्ग आहे. या मार्गावर कायम वर्दळ असते.

गेल्या वर्षी या रस्त्याची दुरवस्था वाढली होते. स्थानिक नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. महापालिका स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्या काळात या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र उर्वरित साडेचार किलोमीटरच्या काँक्रिटीकरण कामासाठी निधी कमी पडत होता.

त्यासाठी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून या कामासाठी सुमारे ४४ कोटी रुपये मंजूर करत महापालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू केले आहे. हॉटेल राऊ ते गजपंथपर्यंतचा मार्ग सोडून पुढील काम सुरू असून या रस्त्यावर पाण्याच्या पाइपलाइन टाकण्यासाठीदेखील खोदाई करण्यात आल्याने व पूर्वीच या रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. (latest marathi mews)

तर मध्ये, मध्ये अनेक ठिकाणी जुना रस्ता तसाच सोडून दिल्याने व नवीन रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच वाहनचालकांना खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा छोटे अपघातदेखील घडत आहे. प्रशासकीय कार्यकाळात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आला होता.

मात्र मागील वर्षी पहिल्या पावसात या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले होते. दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मोठे खड्डे पडण्याची परंपरा येथे कायम होती. तर यामुळे स्थानिक नागरिकांना धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला होता. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव निधी मिळवून दिला. परिसरातील नागरिक वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत.

"अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून उर्वरित रस्त्याचे काम पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. तसेच जिथे रस्त्याचे काम सुरू नाही. तेथील खड्डेदेखील तातडीने बुजविण्यात यावे." - रोशन अहिरे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

Women's World Cup: पोरींची अभिमानास्पद कामगिरी! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंसाठी TATA ची मोठी घोषणा

Ratnagiri Political : रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

IRCTC Recruitment 2025: IRCTC मध्ये ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, पगार आणि मुलाखतीचे ठिकाण

SCROLL FOR NEXT