Damini Squad with Nashik Police Commissioner Sandip Karnik esakal
नाशिक

Nashik Police : शहरातील महिलांच्या सुरक्षितेसाठी 38 दामिनी सज्ज! पोलीस ठाणेनिहाय दामिनी पथकाची नियुक्ती

Nashik News : शहरातील महिलांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वासित करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यांमध्येच दामिनी पथक सज्जतेचा उपक्रम हाती घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : शहरातील महिलांना सुरक्षितता वाटावी, कोणत्याही क्षणी असुरक्षित वाटताच शहर पोलीस आयुक्तालयाच्या दामिनी पथकाला ‘कॉल’ केल्यास काही क्षणात महिला पोलीस मदतीसाठी हजर, असे ३८ महिला पोलीसांचे दामिनी पथक शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले असून, शहरातील महिलांना त्यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (Nashik Police 38 Damini ready for safety of women in city news)

शहरातील महिलांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वासित करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यांमध्येच दामिनी पथक सज्जतेचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत या प्रमुख असतील तर गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची या दामिनी पथकावर देखरेख असणार आहे.

शहर आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांमध्ये दोन महिला अशारितीने ३८ महिला पोलीस अंमलदारांचे दामिनी पथक म्हणून नियुक्ती केली आहे. या पथकामार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती वाहनातून सतत गस्त सुरू राहणार आहे. कोणत्याही महिलेने दामिनी पथकाला ‘कॉल’ केल्यास तात्काळ ते पथक घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करणार आहे. (Latest Marathi News)

त्याचप्रमाणे, या दामिनी पथकाला आपल्या शाळा, महाविद्यालय, हौसिंग सोसायटीमध्येही चर्चा करण्यासाठी पाचारण करता येणार आहे. यामुळे दामिनी पथकाचा त्या-त्या परिसरातील महिलांशी संपर्क वाढण्यास मदत होणार आहे.

दामिनी पथकाला साधा संपर्क

- पंचवटी, आडगाव, म्हसरुळ : ९४०३१६५८३०

- सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर : ९४०३१६५६७४

- नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प : ९४०३१६५१९३

- अंबड, सातपूर, इंदिरानगर - ९४०४८४२२०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT