deepak pandey esakal
नाशिक

नाशिक पोलिस आयुक्तांची अशीही श्रध्दा, आठ महिन्यांपासून रोजच गोदेत डुबकी!

विनोद बेदरकर

नाशिक : गंगा गोदावरी नुसतीच नदी नाही तर, कोट्यवधी जीवांची ती जीवनदायीनी आहे. अशा पावन गोदावरीकाठी अनादी काळापासून समृद्ध संस्कृती फुलली. ‘गंगे च्‌ यमुने चैव गोदावरी सरस्वति.. नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं कुरु…’ म्हणून लाखोंच्या हृदयात गोदावरीबद्दल श्रद्धा आहे. या सश्रद्ध भावनेस नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेही अपवाद नाहीत. याच श्रद्धेपोटी ते तब्बल ८ महिन्यांपासून रोज पहाटे गोदावरीत स्नान करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या श्रद्धेपासून प्रेरणा घेत महादेवपूरच्या ग्रामस्थांनी गोदावरी स्वच्छतेचा संकल्प सोडला आहे.

गोदावरीप्रती श्रद्धा असलेल्यांची यादी भली मोठी आहे. यात आता नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक शिवानंद पांडे हे एक नाव जोडले गेले आहे. पांडे हे केवळ निष्ठेपोटी रोज गोदावरीत स्नान करतात. गोदावरीच्या तिरावर नागरीकरण, उद्योग, धार्मीक-अध्यात्मिक कृषी संस्कृती उभी राहिली आहे. असे महात्म्य सांगणाऱ्या गोदावरी पात्रात सलग आठ महिन्यांपासून पांडे यांच्या श्रद्धेची अनुभूती महादेवपूरवासीय घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरपंच विलासराजे सांडखोरे यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी (ता. ७) स्नानाला आलेले आयुक्त पांडे व त्यांचे वडील शिवानंद पांडे यांची सदिच्छा भेट घेत छोटेखानी सत्कार केला.

अन् ग्रामस्थांचा संकल्प

पोलिस आयुक्त पांडे यांनी ग्रामस्थांना गंगास्नानाचे महत्व व पावित्र्याविषयी प्रबोधन केले. महादेवपूर गावाला लाभलेला गोदावरीचा किनारा व भोवतालच्या निसर्गरम्य वातावरणाचे महत्व पटवून देतानाच, त्यांनी रोज गंगास्नानाची इच्छा ग्रामस्थांसमोर मांडली. सरपंच सांडखोरे व त्यांचे युवा सहकारी सध्या महादेवपूर गावात नेतृत्व करीत आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या कृतीशील श्रद्धेतून प्रेरणा घेत गावात स्वच्छता करतानाच नदीपात्र प्रदूषित होणार नाही, ते कायम स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला आहे.

पांडे यांना शासनाच्या बंगल्यात अनेक सुविधा असताना ते पवित्र गोदावरीत स्नान करायला येतात, ही बाब गोदाकाठच्या नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहे. वरिष्ठ आधिकारी जेव्हा स्वत:च्या कृतीतून गोदावरीप्रती श्रद्धेचे आचरण करतात, तेव्हा त्यांचा आदर्श घेऊन आम्ही महादेवपूर ग्रामस्थांनी स्वच्छतेसह नदीस्वच्छतेचा संकल्प सोडला आहे.

- विलासराजे दत्तू सांडखोर, सरपंच, महादेवपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : पुन्हा एकदा पुणेरी बॅनर चर्चेत... आगळ्या -वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT