Police Recruitment Result of written exam declared esakal
नाशिक

Police Recruitment 2024 : लेखी परीक्षेचा निकाल जाहीर; हरकतींसाठी पाचारण

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रविवारी (ता. ७) पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रविवारी (ता. ७) पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसंदर्भातील हरकतींसाठी उमेदवारांना मंगळवारी (ता. ९) दुपारी बारापर्यंत पोलिस मुख्यालयाचे उपायुक्तांकडे अर्जासह उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे. (Police Recruitment 2024 Result of written exam declared)

शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदांसाठी रविवारी (ता.७) लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी १ हजार १९७ उमेदवारांपैकी १ हजार १८५ जणांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर परीक्षेची उत्तर पत्रिका (अन्सर की) आयुक्तालयाने संकेतस्थळ व आयुक्तालयाच्या फलकावर जारी केली होती.

या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ८) आयुक्तालयाच्या nashikcitypolice.gov.in या संकेतस्थळावर आणि आयुक्तालयाच्या सूचना फलकावर जाहीर केला आहे. (latest marathi news)

या लेखी परीक्षेसंदर्भात मिळालेले गुणांबाबत काही हरकती असतील तर अशा उमेदवारांनी त्यांच्याकडील ओएमआर दुय्यम प्रतींसह मंगळवारी (ता.९) दुपारी बारापर्यंत मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या दालनात लेखी अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT