chhagan bhujbal 
नाशिक

नाव बदलाचा पायंडा भाजपचाच, आम्ही चालवतोय; पालकमंत्री भुजबळ यांचा टोमणा

विनोद बेदरकर

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेचे नाव मुख्यमंत्री जलसंवर्धन शिवार झालं तर काय बिघडलं. नावं बदलण्याचा पायंडा तुम्ही (भाजप) ने पाडला आहे. सगळी नावं बदलली.तोच पायंडा आम्ही चालवतोय. जलयुक्त शिवार योजनेची नावे बदलली असली तरी मुख्यमंत्री असेच नाव दिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांनी भाजपचा मुख्यमंत्री आल्यावर त्यांना त्याचा फायदा होईल. असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला टोमणा मारला. 

कायदा रद्द करून नवा कायदा करावा

नाशिकला आदिवासी उपयोजनेच्या बैठकीच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शेती हा विषय केंद्र आणीो राज्य दोघांचाही आहे. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र शासनाने सर्व राज्य-सरकार आणि् शेतकरी संघटनासोबत चर्चा करावी. पंतप्रधानांनी हमी भाव होता आणि राहील हे सांगितलं त्यांच स्वागत आहे. शेतकऱ्यांना तेच हवं आहे. मात्र, आश्वासन देणं आणी कायदा करणं या स्वतंत्र गोष्टी आहे. सध्या आहे तो कायदा रद्द करून नवा कायदा करावा. केंद्र शासनाने द्राक्ष बागासाठी निर्यात अनुदान केल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका आहे. द्राक्ष निर्यात साठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात होते मात्र आता हे अनुदान रद्द केले. शेतकरी अडचणीत असतांना पून्हा त्यात वाढ होणार आहे. जिल्ह्यात छोट्या शेतकऱ्यांच्या जमीनी, मालमत्ता विकून वसुली करू नका या जिल्हा बँकेला सूचना दिल्याचे  भुजबळ यांनी सांगितले. 

विकास व्याख्येचा फेरविचार 

- उत्तराखंड घटना धक्कादायक आहे. विकास करतांना पर्यावरण हानी होते त्याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हिमनग कोसळायला लागलं आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विकास करतांना थांबायचं कुठे हे ठरवायला हवं. विकासाच्या निमिताने मानवी हस्तक्षेप आणि चुका वाढल्या आहे 

- आदिवासी मंत्रालयाची जिल्हा उपयोजनासाठी 298 कोटींची मर्यादा होती 
- मागण्या जास्त असल्यानं, चर्चेअंती 350 कोटी झाले मंजूर 
- आरोग्य,अंगणवाडी विकास,अमृत आहार योजना, रस्ते याकरिता तरतूद 
- आदिवासी विकास निधी मिळाला की त्वरीत कामं करण्याच्या सूचना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT