Disturbance of twelve esakal
नाशिक

Nashik News : गोदाकाठ भागातील बारवांची दुरवस्था; दुष्काळात होऊ शकतो पर्याय

Nashik : पान सेकंड मेन करता येईल. वेळेत मेन न आल्यास मेन ही करता येईल.

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील ऐतिहासिक प्राचीन वास्तू म्हणजे गोदाकाठ भागात बारव. भेंडाळी, सोनगाव,म्हाळसाकोरे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या विविध बारव आज दुर्लक्षित आहेत. एका बाजूला उन्हाच्या झळांनी पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासत असताना अनेक चांगल्या पाण्याच्या बारव मात्र दुर्लक्षित आहेत. सोनगाव येथे ५३ पायऱ्यांची व महादेवाच्या पिंडीच्या आकाराची बारव बांधली. (Nashik Poor condition of barwa in godaghat area marathi News )

तर भेंडाळी येथे असलेल्या २ ठिकाणी २५ हुन अधिक पायऱ्या आहेत. या बारवेच्या पाण्याचा वापर जवळजवळ २०० हुन अधिक वर्ष सर्वच नागरिकांनी केला.नंतर होत गेलेली प्रगती,मानवाची कल्पकता या माध्यमातून घरोघरी नळ आल्याने बारवेचा वापर थांबला.पर्यायाने बारवेभोवती झाडेझुडपे तयार झाली व त्याचे रूपांतर आज भयानक दाट झाडीत झाले आहे. झाडाचा पालापाचोळा बारवेत पडून संपूर्ण बारवेचे पाणी दूषित झाले.

तटाभोवती असलेल्या झाडांची मुळे खोलवर जाऊन बारवेची तटबंदी कमजोर होऊन भेगा पडल्या आहेत. एके काळी रस्त्याच्या कडेचे सौंदर्य असलेली बारव जीर्ण झाली आहे. नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या सोनगाव, भेंडाळी,तसेच आजूबाजूच्या गावांच्या सध्याच्या परिस्थितीत बारवेतील पाणी उपसा करून ते स्वच्छ केल्यास दोन गावांची पाण्याची गरज भागू शकते, इतके पाणी त्या बारवेमध्ये उपलब्ध आहे.

याच पद्धतीने भेंडाळी येथे गावात व शिवारात असलेल्या बारवेची दुरवस्था झाली असून प्रशासन,पुरातत्त्व खात्याने दखल घेत स्वच्छता सह सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना केल्यास दीर्घकालीन उपयोगात येऊ शकते.

कचराकुंड्याचे स्वरूप

भेंडाळी व सोनगाव येथील बारवांमध्ये अजूनही बारा महिने पाणी आहे.पण हल्लीच्या काळात बारव दुर्लक्षित झाले आहेत.प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या बारवांना कचराकुंडय़ांचे स्वरूप आले आहे. निर्माल्य,प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या,कचरा बारवांमध्ये फेकण्यात आलाय,पण अनेकदा तरुणांनी बारव स्वच्छतेची संवर्धनाची मोहीम हाती घेतली परंतु काही दिवसांनंतर जैसे थी परिस्थिती राहतेय.

''माँ साहेब अहिल्या देवींनी बांधलेली ही बारव स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असतांना अजूनही त्यात असलेले पाणी हे दूरदृष्टीचे महत्व अधोरेखित करतात. शासनाने या वास्तूंचे जतन करत हा ठेवा जपावा.''- भूषणसिंह राजे होळकर (वंशज होळकर घराणे इंदूर)

''बारवा वास्तुशास्त्र,रचना,सौंदर्य उपयुक्तता या सर्वच अर्थाने पर्यटन स्थळ बनू शकतील. या बारवांचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकेल, इतके चांगले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी ही मोठी समस्या असते. या पाण्याचा उपसा झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.''- भाऊसाहेब ओहोळ (सोनगाव ता निफाड)

''अहिल्याबाई होळकर यांनी गावागावांत तयार केलेल्या बहुतेक बारव आजही दुष्काळ पडला तरी पाण्याने भरलेल्या आहेत.या बारवांचा वापर कालांतराने बंद झाला असला तरी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या बारवांचा वापर झाल्यास बहुतेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.''- गोरख खालकर (भेंडाळी,ता निफाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT