Loni Sponge Dosa
Loni Sponge Dosa esakal
नाशिक

Summer South Indian Food: पचनास योग्य साउथ इंडियन डिशेसला पसंती! वाढत्या तापमानामुळे खवय्यांकडून मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष होते. म्हणून अनेकांनी आपली आहार पद्धत बदललेली आहे. फास्टफूडबद्दल आरोग्यासंदर्भात अनेक मतमतांतरे असली तरी फास्टफूडचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, हे वास्तव आहे. आरोग्याच्या दृष्टीने फास्टफूडमध्ये ही पचण्यास हलके सात्विक म्हणून साउथ इंडियन डिशेसला सध्या जास्त मागणी आहे. (Nashik summer Digestive South Indian Dishes marathi news)

साउथ इंडियन डिशेस म्हटले की इडली, सांबार, मेंदू वडा, मसाला डोसा, उत्तप्पा ही नावे आपल्यासमोर येतात. मात्र, आता यातही एकप्रकारे क्रिएटिव्हिटी करून तयार केलेल्या वेगवेगळ्या डिशेसमध्ये लोणी स्पंज डोसा, आप्पे या पदार्थांना अधिक मागणी आहे.

नाश्ता म्हटले की पोहे, चहा, बिस्किट, उपमा असे मराठी पारंपारिक पदार्थ आपल्यासमोर येतात. मात्र, कालांतराने त्याची जागा वडापाव, मिसळपावने घेतली आहे. सध्या मार्केटमध्ये साउथ इंडियन डिशेसचा जास्त बोलबाला बघायला मिळत आहे. पचण्यास हलकाफुलका आहार व ऑइल फ्री यामुळे अधिक मागणी आहे.

सध्या ही मागणी इतकी वाढत आहे की मिसळपाव, वडापाव पारंपारिक नाश्त्याच्या बरोबरीने ही मागणी आहे. साउथ इंडियन म्हणजे दक्षिण भारतीय अन्नामध्ये काही औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. दक्षिण भारतीय अन्नामध्ये तांदूळ आणि नारळ हे मुख्य घटक आहेत. मुळात हे पदार्थ खूप चवदार आणि आरोग्यदायी असतात.

कारण, त्यात जास्त तेल नसते. इडली वाफवून शिजवली जाते. सांबारमध्ये विविध भाज्यांचा समावेश होतो. ज्यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. डाळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे, लोह, जस्त, फोलेट आणि मॅग्नेशियम असतात. सुरळीत पचनासाठी सांबर हा सर्वोत्तम पदार्थ आहे.  (latest marathi news)

काय आहेत पौष्टिक घटक

प्रथिने जास्त, भरपूर फायबर, वजन कमी करण्याचे फायदे, प्रथिने जास्त, भरपूर फायबर, पोषक तत्वांनी युक्त, पचायला सोपे, कमी कॅलरीज, ग्लूटेन-फ्री, प्रथिनांनी समृद्ध, सॅच्युरेटेड फॅट्समध्ये कमी, आतड्यांचे आरोग्य, एनर्जी बूस्ट.

"लोणी स्पंज डोशाला सर्वाधिक मागणी आहे. दिवसभरात वेगवेगळ्या शंभर साउथ इंडियन डिशची विक्री झाली तर त्यापैकी जवळपास निम्म्याहून अधिक लोणी स्पंज डोसाची विक्री होते. पचनास उत्तम, रुग्णही खाऊ शकतात. क्वॉलिटी व त्याबरोबर क्वांटिटी अधिक असल्यामुळे सर्वाधिक मागणी आहे."- पवन लुंगसे, राजगड लोणी स्पंज डोसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT