flyover (file photo)
flyover (file photo) esakal
नाशिक

Nashik News : डबलडेकर पुलाला ‘व्हीजन बॅरिअर’; कन्सल्टिंग कंपनीमार्फत आर्टिलरी कमांडरकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लष्कराच्या विमानतळामुळे एअर फनेल झोनमध्ये प्रस्तावित द्वारका ते दत्तमंदिर या डबलडेकर पुलावर उपनगर नाका ते गांधीनगर येथील मारुती मंदिर या दरम्यान पंचवीस ते तीस फूट उंचीचे दृष्टी अडथळा (व्हीजन बॅरिअर) लावले जाणार आहे. त्यातून मेट्रो निओसह डबलडेकर पुलाचे अडथळे दुर केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पुलाचे डिझाईन तयार करणाया कन्सल्टिंग कंपनीमार्फत आर्टिलरी कमांडरकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. (nashik Proposal to Artillery Commander through Consulting Company for double decker bridge marathi news)

नाशिक रोड व नाशिक दरम्यान वाहतूक सातत्याने वाढत आहे. त्यात मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा झाली. मेट्रो निओ द्वारका ते नाशिक रोड या दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी पूल बांधला जाणार आहे. वाहतुकीचा ताण व मेट्रो या दोन्हीची सांगड घालत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित द्वारका ते दत्तमंदिर या दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

अद्याप पुलाच्या कामाला सुरवात झाली नाही. मेट्रो निओ प्रकल्पदेखील लालफितीत अडकला आहे. त्यात आता निवडणुकांची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुलाचे डिझाईन तयार करताना डबलडेकर पुलासंदर्भात तांत्रिक मुद्दे समोर आले. आर्टिलरी सेंटरची गांधीनगर येथे एअर स्ट्रीप आहे. येथून लष्करी हेलिकॉप्टर व छोट्या लष्करी लढाऊ विमानांचे उड्डाण होते.  ( latest marathi news )

त्यामुळे गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते उपनगर बसस्थानक या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागून एअर फनेल झोन घोषित करण्यात आला आहे. आर्टिलरी सेंटरच्या भिंतीपासून ठराविक अंतरावर ठराविक उंचीपर्यंतचे बांधकामे करता येतात. एअर स्ट्रीप वरून विमानांचे उड्डाण होत असताना विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे निर्माण होवू नये. त्याचप्रमाणे एअर सिग्नल मिळण्यातदेखील अडचणी येण्याची शक्यता असते.

त्यामुळे एअर स्‍ट्रीप पासून एअर फनेल झोन तयार केला जातो. एअर फनेल झोनमध्ये बांधकामांवर मर्यादा असतात. राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर ते उपनगर नाका या दरम्यान एअर फनेल झोन आहे. ६० मीटरपेक्षा अधिक बांधकामे करता येत नाही. डबलडेकर उड्डाणपुलाची उंची त्यापेक्षा अधिक असल्याने मंजुरी मिळण्यात अडचणी येत असल्याचा दावा काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आला. त्यामुळे डबलडेकर उड्डाणपूल होवू शकतं नाही. पूल होणार नसल्याने मेट्रो निओ प्रकल्पदेखील अडचणीत येणार असल्याचा दावा करण्यात आला.

मुंबईच्या धर्तीवर परवानगी

नवी मुंबई व मुंबईत केंद्र सरकारचे मोठे प्रकल्प आहे. तेथून मेट्रोचा मार्ग काढण्यात आला. तेथे व्हीजन बॅरिअर लावण्यात आले आहे. जेणेकरून मेट्रोतून प्रवास करताना पलीकडचे दिसणार नाही. त्याच धर्तीवर डबलडेकर पूल तयार करतानादेखील उपनगर ते गांधीनगर येथील मारुती मंदिर दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलावर व्हीजन बॅरिअर लावले जाणार आहे. जेणेकरून आर्टिलरी सेंटर मधील दिसणार नाही. त्याच आधारे आर्टिलरी सेंटरकडे परवानगीचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT