Sushma Andhare  esakal
नाशिक

Sushma Andhare : मोदींना कशासाठी पंतप्रधान करायचे? सुषमा अंधारे यांचा देवळालीतील सभेत सवाल

Nashik News : मोदींना कशासाठी पंतप्रधान करायचे, याचे एक तरी कारण ‘एनडीए’ आघाडीवाले सांगतील का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : मोदींना कशासाठी पंतप्रधान करायचे, याचे एक तरी कारण ‘एनडीए’ आघाडीवाले सांगतील का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवळाली कॅम्प येथील सभेत उपस्थित केला. ‘एनडीए’ आघाडीचे नेते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागत आहेत. (Nashik Public meeting of Sushma Andhare to campaign for Maha Vikas Aghadi candidate Rajabhau Waje)

मात्र, महिलांची सुरक्षितता, देशातील वाढती महागाई, शेतमालाला मिळणारा भाव, देशाचा ‘जीडीपी’, देशाच्या असुरक्षित सीमा, सुशिक्षित बेरोजगारांची लूट, देशातील विविध घोटाळे, नोकरभरती, १५ लाख रुपये खात्यात येणार होते, ‘अबकी बार चारसो पार’चा नारा देतात; पण पुलवामात ४०० किलो आरडीएक्स आली.

त्यात अनेक जवान शहीद झाले, त्याबद्दलही कुणीच काही बोलत नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी आज येथे केली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली कॅम्पमध्ये उपनेत्या अंधारे यांची जाहीर सभा झाली. जुन्या बसस्थानकात झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागताना ‘सुपारीबहाद्दर’ असा उल्लेख अंधारे यांनी भाषणात वारंवार केला. ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ लावून त्यांचे प्रकरण काढले. (latest marathi news)

त्यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, की राज ठाकरे माझ्यावर व्यक्तिगत आरोप करीत आहेत. मात्र, मला रमेश किणी मृत्यू प्रकरणाचा व्हिडिओ लावायला भाग पाडू नका, कोहिनूर मिल आणि ‘ईडी’च्या नोटीस प्रकरणाबाबत बोलायला भाग पाडू नका, असाही खणखणीत इशारा त्यांनी दिला.

प्रारंभी महापुरुषांच्या अर्धपुतळ्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ वाजे यांचे भाषण झाले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, माजी आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे, रतन चावला, साहेबराव चौधरी आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT