Nashik Pune Railway
Nashik Pune Railway esakal
नाशिक

Nashik Pune Railway : आता शिर्डीमार्गे नाशिक-पुणे रेल्‍वेसेवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे जलद रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या मार्गावरील बोगद्यामुळे प्रकल्‍पाच्‍या खर्चात वाढ होत आहे.

त्‍यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्यायी रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्‍याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Nashik Pune railway service via Shirdi information was given by Deputy Chief Minister Devendra Fadnavis nashik news)

श्री. फडणवीस म्‍हणाले, की मार्गातील बदलामुळे अंतरात ३३ किलोमीटरची वाढ होणार असली तरी या मार्गाचा फायदा नाशिक, पुण्यासोबत शिर्डीदेखील होणार आहे. जास्‍तीत जास्‍त प्रवासी उपलब्‍ध होऊ शकतील.

याबाबत लवकरच प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्‍याचे त्यांनी नमूद केले. यामुळे नाशिक-पुणे अंतर दोन तासांत गाठणे शक्य होऊ शकेल, असेही त्‍यांनी सांगितले.

‘ताटकळत बसावे लागले नसते’, या मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्‍यावर निशाणा साधला.

राज्यामध्ये बंद दाराआड घरात बसून बैठक घेणारे नाही, तर जनतेमध्ये जाणारे मजबूत, काम करणारे आणि जनसामान्यांच्या भावना समजून घेणारे सरकार असल्‍याची टीका श्री. फडणवीस यांनी केली. त्यांच्या पोटदुखीचा लवकरच इलाज केला जाईल, असा टोला ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT