lepard  esakal
नाशिक

Nashik Leopard News : इजमानेत खड्ड्यात पडलेल्या बिबट्याची सुटका

Nashik Leopard : मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बिबट्या पडल्याने ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत खड्ड्यात पडलेल्या बिबट्याची सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील इजमाने येथील शिवारातील शेतकरी किरण शंकर धोंडगे यांच्या पोल्ट्रीतील मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बिबट्या पडल्याने ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत खड्ड्यात पडलेल्या बिबट्याची सुटका केली. (Nashik Rescue of leopard that fell into pit of poultry farm in Ajman marathi news)

शेतीशिवारात शेतकरी किरण धोंडगे यांचा मुलगा रोहीत हा शेतातील (गट क्रमांक २८) मध्ये फेरफटका मारत असताना अचानक त्याला पोल्ट्रीतील मृत कोंबड्या विल्हेवाट लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातून बिबट्याची डरकाळी ऐकू आली. खड्ड्यात डोकावून पाहताच घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूस असलेल्या शेतकऱ्यांना माहिती दिली.

रोहीतने तातडीने ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सदर माहिती दिली. श्री. सहाणे यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांना सुचना करून कर्मचाऱ्यांनी इजमानेत दाखल होत खड्ड्यातून सुरक्षित बिबट्याला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. स्थानिक तरूणांच्या मदतीने खड्ड्यात तयार केलेली लाकडी सिडी सोडण्यात आली होती.

वनकर्मचा-यांनी बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी पांगापांग केली व काही वेळातच खड्ड्यातील सिडीच्या साहाय्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. यावेळी वनकर्मचा-यांसह वैभव धोंडगे, धनराज धोंडगे, गणेश धोंडगे, अभिजित धोंडगे, तुषार धोंडगे, नरेंद्र धोंडगे, निलेश धोंडगे, अभय धोंडगे आदिंनी बिबट्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

''इजमानेत बिबट्या खड्ड्यात पडल्याची माहीती मिळताच ताबडतोब बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.'' -शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र आधिकारी, ताहाराबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT