nashik2.jpg 
नाशिक

लॉकडाउनमध्ये नाशिककरांनी चक्क भरला 'इतका' दंड!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी तब्बल इतक्या रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड इतका करण्यात आला असून, त्यापैकी एवढ्या रुपयांची वसुली शिल्लक आहे.

सूचनांकडून होतोय कानाडोळा

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 297 वर पोहोचला आहे. सर्वाधिक 274 रुग्ण मालेगावमधील आहेत. तसेच शहरातदेखील ११ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे.

भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल

पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल ५८० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड १८ लाख ९० हजार १०० रुपये इतका करण्यात आला असून, त्यापैकी १५ लाख २६ हजार ७०० रुपयांची वसुली शिल्लक आहे.

पावणे चार हजार लोकांवर गुन्हे

लॉकडाउन लवकर संपवावा, असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनाभरात लॉकडाउनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT