Adimaya's resplendent and reassuring idol and attractive peacock made of flowers. esakal
नाशिक

Saptashrungi Devi : तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो...! सप्तमीला राज्यभरातील भाविकांकडून आदिमायेचा जागर

Latest Navratri 2024 News : जयघोष व डफ-ताशाच्या निनादात सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीनिमित्त आदिमायेचा जागर करीत लाखावर भाविक देवीचरणी बुधवारी (ता. ९)नतमस्तक झाले.

सकाळ वृत्तसेवा

वणी : सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो... तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो..., शेवंती जा‌ईजु‌ई पूजा रेखीयली बरवी हो... भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो... या नवरात्रीच्या आरतीतील ओळीची अनूभुती घेण्यासाठी ‘सप्तशृंगी माता की जय, अंबे माते की जय’चा जयघोष व डफ-ताशाच्या निनादात सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीनिमित्त आदिमायेचा जागर करीत लाखावर भाविक देवीचरणी बुधवारी (ता. ९)नतमस्तक झाले. (saptashrungi devi gad Jagar by devotees)

नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. बुधवारी सप्तमीनिमित्त देवी दुर्गेच्या सातव्या रूपाची विधिवत पूजा केली जाते. सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीच्या दिवशी गुजरातसह राज्यभरातून लाखो भाविक परंपरेने दर वर्षीप्रमाणे आजही गडावर येऊन देवीचे दर्शन घेतले.

यात पदयात्रेने आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय असून, ठिकठिकाणच्या पालख्या आदिमायेच्या भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. सप्तमीनिमित्त सकाळी सातला देवीच्या अलंकाराचे न्यासाच्या कार्यालयात विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर पारंपरिक वाद्यात दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मंगळवारी (ता. ८) सप्तमीच्या पूर्वसंध्येलाच पदयात्रेने हजारो भाविक दाखल झाले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. बुधवारी पहाटेनंतर गर्दीत अधिकच वाढ होत गेल्याने बाऱ्या सकाळी आठला पहिल्या पायरीपर्यंत आल्या होत्या. त्यानंतर उशिरापर्यंत भाविकांची रांगा धर्मार्थ दवाखान्यापर्यंत पोचल्या होत्या. (latest marathi news)

सप्तमीची पंचामृत महापूजा व आरती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांनी सपत्नीक केली. तसेच विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, आमदार देवयानी फरांदे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी कुटुंबीयासमवेत श्री भगवतीचा आशीर्वाद घेत संकल्प आरती केली.

नवरात्रोत्सवादरम्यान होत असलेली भाविकांची गर्दी बघता सेवालाल तलाव परिसरात निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्तमीनिमित्त भक्तांगण सभागृहासह मंदिर परीसरात शेकडो महिलांनी सप्तशतीचे पारायण केले. नवरात्रेत्सवातील होमहवन, सप्तशती पारायणाबरोबरच ठिकठिकाणी चक्रपूजेचेही आयोजन करण्यात आले होते.

गर्भगृहात फुलांच्या मोराचे आकर्षण

श्री भगवतीच्या गर्भगृहात बुधवारी फुले व पानांपासून बनविलेला मोर हे आकर्षणाचे कारण ठरत होते. तसेच श्री भगवतीच्या संपूर्ण गाभाऱ्यात सजावटकार शकंरराव जुन्नरे यांनी नाशिक येथील भाविक जयेश मंडलिक यांच्या माध्यमातून निळ्या रंगाच्या फुलांचे केलेले आकर्षक तोरण, झेंडूंची केलेली झुंबर सजावट ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासारखे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT