Household appliance burnt due to short circuit esakal
नाशिक

Nashik : पवन नगरला शॉर्ट सर्किट; लाखोंचं नुकसान

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील राजरत्ननगर येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने रहिवाशांचे विद्युत उपकरणे अचानक बंद पडले. यामुळे लाखांचे नुकसान झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. मर्चंट बँकेच्या पाठीमागील परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. बुधवारी (ता. २) रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठा जाळ निघाला.

या वेळी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक रहिवाशांच्या घरातील विद्युत उपकरणात मोठा आवाज होऊन धूर निघू लागला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेकांनी प्रकार घडल्यानंतर घरातून बाहेर पळ काढला. टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर, विजेची मोटर, फॅन, एलईडी लाइट यासह विविध विद्युत उपकरणे बंद पडली होती. महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी रहिवासी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्थानिक रहिवाशांनी स्पष्ट केले आहे.

"सिडको परिसर हा कामगार लोकांची वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे राहणारे रहिवासी आपल्या पोटाला चिमटा देऊन देऊन गृहोपयोगी वस्तू विकत घेत असतात. अशात त्यांचे झालेलं नुकसान मोठे असून महावितरण विभागाने भरपाई न दिल्यास आंदोलन उभारणार आहे."

- प्रशांत जाधव, महानगरप्रमुख, आरपीआय (आठवले गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disconnect Bill: कार्यालयीन वेळेनंतर ऑफिसच्या कॉल आणि ईमेलला उत्तर द्यावे लागणार नाही! संसदेत मांडलेलं ‘डिस्कनेक्ट राईट’ बिल नेमकं काय?

Indian Railway: 'रेल्वे'ने घेतला मोठा निर्णय! दुर्लक्ष कराल तर मोजावी लागेल किंमत; नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

ना भूकंप, ना पाऊस... तरी खचला राष्ट्रीय महामार्ग, स्कूलबससह अनेक गाड्या अडकल्या

ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती अन् ... 2026 बाबत पुराणात नेमकं काय लिहिलंय, भविष्यवाणी कलियुगासाठी ठरत आहेत खरी? वाचा धक्कादायक सत्य!

SCROLL FOR NEXT