Tribal women planting paddy in Aliabad area. esakal
नाशिक

Nashik Rice Farming : आदिवासी पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीला वेग! समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग

Agriculture News : या परिसरासह गुजरातमधील डांग भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे मोसम नदीच्या उगमस्थान असणाऱ्या साल्हेर किल्ल्यावरून पाण्याचे धबधबे व परिसरातील छोटे-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अंतापुर : बागलाणच्या आदिवासी पश्‍चिम परिसरात दडी मारलेल्या पावसाने सुरुवात केल्याने मोसम नदीसह परिसरातील नदी, नाले दुथडी वाहत असून, हरणबारी धरण क्षेत्रात पाण्याच्या प्रवाहात वाढ होत आहे. त्यादृष्टीने पश्‍चिम आदिवासी भागातील मुख्य पीक भात लागवडीस सुरुवात झाली आहे. (Nashik Speed ​​up rice cultivation in tribal western belt)

महाराष्ट्र-गुजरातच्या सरहद्दीवर असलेला बागलाणचा आदिवासी पश्‍चिम भाग आहे. या परिसरासह गुजरातमधील डांग भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे मोसम नदीच्या उगमस्थान असणाऱ्या साल्हेर किल्ल्यावरून पाण्याचे धबधबे व परिसरातील छोटे-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

भात पिकास मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्याने शेतात गाळ तयार करून बैलजोडीने चिखलणी करून लागवड केली जाते. सुरुवातीला समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंपाचे पाणी टाकून लागवड केली होती. (latest marathi news)

सध्या मानूर, साल्हेर, वाघंबा, बाभूळणे, अलियाबाद जाड, गोळवाड, मोहळंगी परिसरात चिमणचाळ, बासमती, इंद्रायणी, मेनका, ३६५, ३८०, एककाडी या जातीच्या भाताच्या रोपांची लागवड जोमाने सुरू आहे.

"आदिवासी परिसरातील भात हे मुख्य पीक असल्याने वर्षभर त्या पिकावर संसाराचा उदरनिर्वाह केला जातो. आठवडे बाजाराच्या आदल्या दिवशी कमद हलरवर तयार करून त्यातून तांदूळ विक्रीसाठी नेण्यात येतो. तसेच, बांबूच्या काड्यांपासून तयार केलेल्या कणगीमध्ये चार-पाच वर्ष कमद राहू शकते व त्यातील तांदूळ स्वादिष्ट असतो."- नंदू चौरे, अलियाबाद, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT