Sports Update esakal
नाशिक

Nashik Sports Update : नाशिकच्या मुलींची सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक

अरुण मलाणी

नाशिक : आज संध्याकाळी नाशिक विरुद्ध सांगली या दोन संघामध्ये झाला. आपल्या पहिल्या आक्रमणात नाशिकने सांगलीचे सात गडी बाद केले. तर सांगलीने नाशिकचे सहा गडी बाद केले.नाशिक कडून आक्रमण करतांना वृषाली भोये हिने चार गडी बाद केले. तिला सोनाली पवार, निशा वैजल, आनी सुषमा चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर संरक्षण करतांना निशा वैजल दोन मिनिट तीस सेकंद, सोनाली पवार एक मिनिट तीस सेकंद, मनिषा पडेर एक मिनिट पन्नास सेकंद, दिदी ठाकरे एक मिनिट पंचेचाळीस सेकंद, सरीता दिवा एक मिनिट पंधरा संघ यांच्या चांगल्या खेळीने मध्यांतराला सात विरूध्द सहा अशी एक गुणांची आघाडी निर्णायक ठरली. (Nashik Sports Update Nashik girls reached final for second year in row in kho kho tournament Nashik News)

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

तर दुसऱ्या आक्रमणात वृषाली भोये आणि सरीता दिवा प्रत्येकी दोन गडी, दिदी ठाकरे आणि सुषमा चौधरी प्रत्येकी एक गडी यांनी चांगले आक्रमण केले. तर दुसऱ्या डावात संरक्षण करतांना निशा वैजल एक मिनिट तीस सेकंद, सोनाली पवार दोन मिनिट तीस सेकंद, दिदी ठाकरे एक मिनिट वीस सेकंद, सरीता दिवा एक मिनिट आणी सुषमा चौधरी हिने केलेला नाबाद एक मिनिटाची खेळी ही विजयी ठरली. नशिकने हा सामना १३ विरुद्ध १२ असा एका गुणांनी जिंकून सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

SCROLL FOR NEXT