Dindori Lok Sabha review meeting was held at Hotel SSK in the presence of BJP state president, office bearers present on this occasion. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : सर्व बाजूला ठेवा, मोदींसाठी एकजुटीने कामाला लागा : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी अन् केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा तुटलेला जनसंपर्क याचा एकत्रित परिणाम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेले निर्णय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी अन् केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा तुटलेला जनसंपर्क याचा एकत्रित परिणाम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिसून आला. कांदा प्रश्‍न आम्हाला रडवत असल्याचा सूर आळवत पदाधिकाऱ्यांनी मंत्री डॉ. पवार यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. ( State President Chandrashekhar Bawankule statement of Leave everything aside work unitedly for Modi)

त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतर्गत सर्व नाराजी बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन पक्ष पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी शहरातील हॉटेल एसएसके येथे पार पडली.

या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, लोकसभा समन्वयक बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, सुनील बच्छाव, माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अमृता पवार आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानसभानिहाय बूथ कमिटी, सुपर वॉरियर्स, संपर्क अभियानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यात अनेक पदाधिकाऱ्यांनी कांद्याबाबत मतदारसंघात मोठी नाराजी असल्याचे सांगितले. या मुद्द्यावर विरोधक आपल्यावर टीका करत आहेत. मंत्री पवार यांच्या संपर्कबाबतही अनेकांनी या वेळी तक्रारी मांडल्या. यावर पदाधिकाऱ्यांनीच मतदारसंघासाठी खूप कष्ट घ्यावे लागलीत, परिस्थिती गंभीर आहे, अशा शब्दांत बोलू लागले. कांदाप्रश्न नीट हाताळला असता, तर बैठक घेण्याची वेळ आली नसती, असे सांगितले.  (Nashik Political News)

यावर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लागलीच हस्तक्षेप करत, गंभीर आहे असे म्हणू नका. आपल्या पक्षाकडे पंतप्रधान मोदी आहे. त्यांचे दहा वर्षांतील काम आहे. हे काम लोकांसमोर घेऊन जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना प्रचार यंत्रणेत काय बदल केले पाहिजे, याबाबत विचारणा केली. त्यावर अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या.

डॉ. पवार यांनी कांदाप्रश्नी काँग्रेसने ६० वर्षांत जे काम केले नाही ते दहा वर्षांत मोदी सरकारने केले असल्याचे सांगितले. याप्रश्नी विरोधकांचे मुद्दे खोडून काढा, त्यासाठी मोदी सरकारने नेमके काय केले आहे याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी जाणून घ्यावे. संपर्कात कमी पडल्याची भावना त्यांनी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोदी सरकारचे, तसेच मंत्री डॉ. पवार यांचे मोठे काम तुमच्याकडे आहे.

हे काम मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोचवा. कांदाप्रश्न प्रदेश पातळीवरून योग्य पद्धतीने मांडला जाईल. त्याची काळजी करू नका. पदाधिकाऱ्यांनी आत्मविश्वासाने विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढले पाहिजे, असे सांगितले. काय झाले, यापेक्षा आपल्याला पुढील पाच वर्षांत मतदारसंघासाठी काय करायचे आहे, हे लोकांना सांगावे.

अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यासाठी ५० हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी करावी, अशा सूचना त्यांनी मांडल्या. निवडणुकीसाठी विधानसभा व बूथनिहाय कमिट्या तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांची शेवटची निवडणूक

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ‘उबाठा’ गटाचे उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत दारुण पराभव होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा उभे राहू शकणार नाही. त्यामुळे ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT