While cleaning the water tank at Zilla Parishad School in Bhindi  esakal
नाशिक

Nashik News : नव्या वर्षासाठी विद्यार्थी अन् शाळा सज्ज! विविध कार्यक्रमांचे नियोजन; प्रवेशोत्सव होणार जल्लोषात

Nashik News : शाळेतील गमती-जमती, खेळ आणि अभ्यास यामध्ये रममाण होण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मे महिना संपून जून महिना सुरू झाला की शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. दोन महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत शाळेतील मित्रांना न भेटल्यामुळे त्यांच्या भेटीची आतुरता मुलांना लागलेली असते. शाळेतील गमती-जमती, खेळ आणि अभ्यास यामध्ये रममाण होण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कळवण तालुक्यातील २०३ जिल्हा परिषद शाळा व वर्ग खोल्यांची स्वच्छता, दुरुस्ती, डागडुजी केली आहे. सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहे. दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची ५४९ मंजूर पदे आहेत.

पैकी ५१७ शिक्षक कार्यरत आहेत. ३२ रिक्त पदे आहेत. गणोरे, मोकभनगी, पिंपळे, बंधारपाडा, दळवट, कातळगाव, लिंगामे, कळवण खुर्द, भांडणे शिव, भेंडी, पुणेगाव, बेलवारे, सुपले, सावकी, जामले, मांगलीधर, हनुमंतमाळ, निमपाडा, खर्डे दिगर यासारख्या पश्‍चिम पट्ट्यातील शाळांमध्ये उपशिक्षकांची एक एक पद रिक्त आहे. शिक्षक बदल्यांना आचारसंहितेमुळे तुर्तास स्थगिती आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कळवण तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या २८ हजार ९५३ विद्यार्थ्यांना १ लाख १५ हजार ८१२ नव्याकोऱ्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०३, माध्यमिकच्या २० व खासगी १४ अशा एकूण २५० शाळांत ही पुस्तके वितरित केली जाणार आहेत. (latest marathi news)

पहिली ते ५ वीचे ११ हजार ९३८, तर सहावी ते आठवीचे १७ हजार १५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. तालुक्यातील १६ केंद्रांतून शाळास्तरावर केंद्रप्रमुखांनी १० ते १२ जून रोजी शाळेत सदर पुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले आहे.

"शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या दिवशी विद्यार्थी स्वागत, मिष्टात्र खाऊ वाटप, पुस्तक वाटप, शाळा स्वच्छता, गुणवत्ता नियोजन, प्रवेशोत्सव सभा होणार आहे. शंभर टक्के पटनोंदणी करणाऱ्या शाळेला प्रशस्तीपत्र देणे आदी कामे शिक्षण विभागाकडून पूर्ण झाली आहेत." - हेमंत बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, कळवण

"आमच्या शाळेत दाखलपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झालेला आहे. मुलांचे आणि पालकांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात गुलाबपुष्प देवून केले जाणार आहे. शालेय वातावरण निर्मितीसाठी व शाळा स्वच्छता, परिसर स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत." - भास्कर भामरे, मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, नाकोडे

"शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांमध्ये गणवेशाबाबत आनंदाचा विषय असतो. परंतु, शासनाने गणवेश खरेदीबाबत वेगळा निर्णय घेतल्याने यावर्षी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणार नाही. शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गणवेश खरेदी निर्णय अंमलात आणवा." - अनिल रौंदळ, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, भेंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT