Mr. Fogger system installed by Pagar in their cattle shed. esakal
नाशिक

Summer Heat : उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्यासाठी ‘फॉगर’ प्रणाली; कळवण येथील शेतकरी रवींद्र पगार यांच्याकडून वापर

Summer Heat : उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाढलेल्या तापमानाचा जसा परिणाम हा नागरिकांवर होत आहे.

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाढलेल्या तापमानाचा जसा परिणाम हा नागरिकांवर होत आहे. तसाच तो जनावरांवर होत असल्याने जनावरांना उन्हाचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने कळवण येथील शेतकरी रवींद्र दामू पगार यांनी गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम बसविली. यामुळे गोठा थंड राहत असून जनावरांवर उन्हाचा त्रास होत नसल्याने श्री. पगार यांनी सांगितले. (nashik Summer Heat Fogger system to keep cattle house cool in summer )

कळवण तालुक्यात उन्हाळा तीव्र असल्यामुळे जनावरांनाही याचा त्रास होतो. वाढत्या उन्हामुळे त्याचा विपरित परिणाम दूध उत्पादनावर, जनावरांच्या पोषणावर तसेच प्रजननक्षमतेवर होत असतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील दिसून येतो.

त्यामुळे गोठ्या जनावरे बांधल्यानंतर त्यांना उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतूने श्री. पगार यांनी गोठ्यातच ‘फॉगर’ प्रणाली लावली आहे. फॉगर सिस्टीमने गोठा थंड राहतो. फॉगर सिस्टीममधून जे पाणी बाहेर येते ते पाणी हवेमध्ये डायलुट होते. त्यामुळे जनावरे किंवा चारा भिजत नाही. लाईट नसेल तर हे सिस्टीम बॅटरीवर सुद्धा चालते. आपल्या गोठ्याच्या आकारानुसार हे सिस्टीम बसवता येते. (latest marathi news)

उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा बराच ताण असतो. तीव्र उन्हामुळे प्रजननक्रिया थांबते अथवा त्यास हानी पोचते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते. त्यामुळे जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी उन्हाळ्यात जनावरांना गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे.

''माझ्याकडे एकूण ४० पशुधन आहे. तीव्र उन्हाचा जनावरांना त्रास होवू नये म्हणून मी गोठ्यात फॉगर सिस्टीम लावली आहे. दर तासाला १५ ते २० मिनिटे हे सिस्टीम चालू ठेवल्याने गोठा पूर्णपणे थंड राहतो. त्यामुळे तीव्र उन्हाळ्याचा तापमानाचा त्रास जनावरांना होत नाही. गोठ्यात २० फॉगरसाठी मला पंचवीस हजार रुपये खर्च आला.''- रवींद्र दामू पगार, दूध उत्पादक शेतकरी, कळवण

''सध्या तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळ्याचा जनावरांवर देखील परिणाम होतो. यासाठी शेतकऱ्यांनी फॉगर सिस्टीम बसवावी. त्यामुळे जनावरांना वाढत्या तापमानाचा त्रास होत नाही व जनावरे आजारीही पडत नाहीत.''- डॉ. डी.एन. पावसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT